शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’साठी खडसेंचा आग्रह

By admin | Updated: November 19, 2015 03:40 IST

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन काही आठवड्यांवर आले असून मंत्र्यांच्या बंगल्यांचे वाटप अद्याप झालेले नाही.

प्रशासनाला पाठविले पत्र : प्रकृतीचे कारण की नंबर दोनचा दावा?नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन काही आठवड्यांवर आले असून मंत्र्यांच्या बंगल्यांचे वाटप अद्याप झालेले नाही. उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘देवगिरी’साठी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आग्रह धरला आहे. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला पत्रदेखील लिहिले आहे. खडसेंना हा बंगला द्यायचा की नाही याबाबतचा निर्णय अखेरच्या क्षणीच होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या या आग्रहामागे मंत्रिमंडळात स्वत:ची क्रमांक दोनची जागा सिद्ध करण्याचा प्रयत्न तर नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरपासून प्रारंभ होत असून मंत्र्यांच्या बंगल्यांचे वाटप झालेले नाही. ‘देवगिरी’ हा बंगला उपमुख्यमंत्र्यांसाठी राखीव आहे. परंतु राज्य शासनामध्ये उपमुख्यमंत्रिपद नाही. त्यामुळे मागील अधिवेशनातदेखील ‘देवगिरी’ बंगला रिकामाच ठेवण्यात आला होता. यातून अनेक जेष्ठ मंत्र्यांचा भ्रमनिरासदेखील झाला होता. परंतु मुख्यमंत्र्यांनीच हा निर्णय घेतल्यामुळे कोणीही यावर भाष्य केले नाही.यंदादेखील हा बंगला रिकामाच राहतो की काय याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. यातच खडसे यांनी स्थनिक प्रशासनाकडे पत्र पाठवून प्रकृतीच्या कारणांमुळे ‘देवगिरी’ बंगला देण्यात यावा, अशी विनंती केली आहे. मुख्यमंत्रिपद न मिळाल्यामुळे खडसे यांनी विविध माध्यमातून आपली नाराजी वारंवार व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘रामगिरी’वर नाही, तर कमीतकमी उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘देवगिरी’वर राहण्याची संधी मिळावी म्हणून तर त्यांनी अशी विनंती केली नाही ना, अशा चर्चांना ऊत आला आहे.(प्रतिनिधी)नंबर दोन पद सिद्ध करण्यासाठी आग्रहमुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल परिसरात मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला देण्यात आला आहे. तर त्या खालोखाल मोठा बंगला ‘रामटेक’ एकनाथ खडसे यांच्याकडे आहे. नागपुरातदेखील क्रमांक दोनचा बंगला आपल्यालाच मिळावा यासाठी खडसे यांचा आग्रह आहे. यातून राज्य शासनातील क्रमांक दोनचे पद सिद्ध होणार आहे.शेवटच्या क्षणी होणार निर्णयकॅबिनेट मंत्र्याचे निवासस्थान असलेल्या रविभवनातील परिसर आणि खोल्या सुशोभित करण्यावर अंतिम हात फिरवला जात आहे. परंतु बंगले कोणाला देण्यात येतील हे अद्याप निश्चित झालेले नाही. याबाबतचा अंतिम निर्णय सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील करतील. ‘देवगिरी’ आपल्याला मिळावा ही खडसेंची इच्छा आहेच व त्यांनी तशी विनंतीदेखील केली आहे. त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन बंगला द्यायचा की इतर मंत्र्यांची नाराजी नको म्हणून मागील वर्षीप्रमाणे यंदाही ‘देवगिरी’ रिकामाच ठेवायचा याचा निर्णय अखेरच्या दिवसांमध्ये होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.