शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
5
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
6
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
7
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
8
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
9
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
10
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
11
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
12
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
13
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
14
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
15
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
16
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
17
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
18
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
19
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
20
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
Daily Top 2Weekly Top 5

श्लोक मूर्ती व चित्रांचे अनोखे प्रदर्शन

By admin | Updated: June 13, 2014 01:25 IST

बहुचर्चित पेंटिंग, मूर्ती व चित्रांचे श्लोक प्रदर्शन जुलै महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. या वर्षीच्या प्रदर्शनातील प्रवेश सुरू झाले असून २० जून २०१४ ही प्रवेशाची अंतिम तारीख आहे. विदर्भातील सर्व

नागपूर : बहुचर्चित पेंटिंग, मूर्ती व चित्रांचे श्लोक प्रदर्शन जुलै महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. या वर्षीच्या प्रदर्शनातील प्रवेश सुरू झाले असून २० जून २०१४ ही प्रवेशाची अंतिम तारीख आहे. विदर्भातील सर्व कलाकारांसाठी ही सुवर्णसंधी असून कलाकारांची तीन गटांत वर्गवारी करण्यात आली आहे. यात पेंटिंग, मूर्ती, ग्राफिक्स प्रिंट यांचा समावेश असेल. प्रदर्शनात कलाकारांना दोन्ही गटात पुरस्कार मोबदला व प्राविण्य प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. प्रत्येक विद्यार्थी कलाकाराला आपल्या पेंटिंगच्या छायाचित्रामागे महाविद्यालयाच्या ओळखपत्राची अ‍ॅटेस्टेड केलेली छायाप्रत लावावी लागेल.
या प्रदर्शनात सहभागी होणारे व्यावसायिक व इतर कलाकार पदवीधर असावेत, तसेच कलाकाराचे ३-४ सोलो एक्झिबिशन किंवा ग्रुप एक्झिबिशन झालेले असावेत. फोटो प्रवेशाच्या वेळी कलाकाराने आपला बायोडाटा सोबत द्यावा. प्रवेशासाठी जमा केलेली छायाचित्रे परत केली जाणार नाहीत. प्रत्येक कलाकार चार पेंटिग्ज पाठवू शकेल.
विद्यार्थी कलाकारांना प्रति पेंटिंगसाठी १५० शुल्क जमा करावे लागणार आहे. व्यावसायिक व इतर कलाकारांकडून प्रति पेंटिंग ३०० रुपये शुल्क आकारण्यात येईल. कोणत्याही कारणाने भरलेली फी परत केली जाणार नाही. सर्व पेंटिंगच्या मागे कलाकाराचे नाव, जन्मतारीख पत्ता, पेंटिंगचे शीर्षक, माध्यम, आकार, मूल्य इत्यादी तपशील असावा. प्रदर्शनासाठी पाठवावयाच्या चित्राच्या कॅनव्हासचे आकारमान ३ फूट बाय ३ फूट निश्चित करण्यात आले असून फ्रेमची मोडतोड झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित कलाकारांचीच राहील.
माउंट बोर्डवरील पेंटिंग स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रदर्शनासाठी निवड झालेली वॉटर कलर व चारकोलने रेखाटलेली चित्रे अ‍ॅक्रॅलिक काचेच्या फ्रेममध्ये असावीत. प्रदर्शनात पेंटिंग व इतर कलाकृतींची विक्री होऊ शकेल. यासंदर्भात अंतिम निर्णय आयोजन पथकाकडे राहील. या प्रदर्शनामुळे सर्व कलाकारांना एक व्यासपीठ मिळणार आहे.
या प्रदर्शनाविषयी अधिक माहितीसाठी ९४२३६८०५११ / ९४२३६२८५०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)