शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील बेपत्ता विद्यार्थी नागपुरात सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 03:23 IST

बंगळुरु जवळच्या मल्लेश्वरम पॅलेस (गुठल्ली नागप्पा स्टेट) मधून पाच दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेला ...

नागपूर : बंगळुरु जवळच्या मल्लेश्वरम पॅलेस (गुठल्ली नागप्पा स्टेट) मधून पाच दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेला १५ वर्षीय विद्यार्थी नागपुरात सापडला. मुकेश बाबूलाल चौधरी असे त्याचे नाव असून, तो ९ वीचा विद्यार्थी आहे.शुक्रवारी दुपारी रिझर्व्ह बँक चौकात तो कावराबावरा होऊन फिरत होता. ते पाहून एका सद्गृहस्थाने त्याची चौकशी केली. बोलेरोमधील काही जणांनी आपले अपहरण केल्याचे मुकेशने त्या व्यक्तीला सांगितले. त्यामुळे त्या व्यक्तीने नियंत्रण कक्षात फोन केला. ही माहिती कळताच सीताबर्डीचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी आपल्या सहकाऱ्यांना पाठवून मुकेशला पोलीस ठाण्यात आणले. त्याला जेवण दिल्यानंतर त्याची विचारपूस करून त्याच्या पालकांशी संपर्क साधण्यात आला. ६ मार्चला मुकेश अचानक बेपत्ता झाला. दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांनी वय्याली पोलीस ठाण्यात मुकेशच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. चौधरी परिवार आणि पोलीस मुकेशचा शोध घेत असतानाच त्यांना मुकेश नागपुरात सुखरूप असल्याची माहिती ठाणेदार बंडीवार यांनी कळविली. इकडे मुकेशने पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार, ६ मार्चला त्याचे बोलेरोमधील काही जणांनी अपहरण केले. जीवे मारण्याचा धाक दाखवून त्याला कथित आरोपींनी पळवून आणले. आज दुपारी ते नागपुरात पोहचले. संधी मिळताच रिझर्व्ह बँक चौकात मुकेशने बोलेरोतून उडी मारली. (प्रतिनिधी)