शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाचे उमरेड, रामटेक डेपो माघारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:07 IST

नागपूर : मागील वर्षभरातील कोरोनाचे लॉकडाऊन, बंद असलेल्या शालेय बसफेऱ्या आणि ग्रामीण भागातून कमी झालेली वर्दळ यामुळे नागपूर जिल्ह्यातील ...

नागपूर : मागील वर्षभरातील कोरोनाचे लॉकडाऊन, बंद असलेल्या शालेय बसफेऱ्या आणि ग्रामीण भागातून कमी झालेली वर्दळ यामुळे नागपूर जिल्ह्यातील उमरेड आणि रामटेक या दोन आगाराची आर्थिक स्थिती खालावली आहे. ग्रामीण भागातून अल्प प्रतिसाद मिळत असल्याने या दोन्ही डेपोमधील ६० टक्के बसेस बंद करण्यात आल्या आहेत.

नागपूर विभागांतर्गत असलेल्या आठ आगारापैकी नागपूर शहरात चार आगार असून काटोल, सावनेर, रामटेक आणि भिवापूर हे चार आगार ग्रामीण भागात आहेत. नागपूर शहरातील आगाराची आर्थिक स्थिती बरी असली तरी उमरेड आणि रामटेक आगाराची स्थिती चांगलीच खालावली आहे. मागील वर्षभरातील अल्प उत्पन्नाचा फटका बसल्याने फेऱ्या कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

उमरेड आगारात ४० एसटी बसेस आहेत. त्यांचा रोजचा प्रवास १५ हजार किलोमीटर असायचा. मात्र प्रवासी नसल्याने ४० पैकी सध्या फक्त १७ ते १८ बसेस चालविल्या जात आहेत. बसेसचा प्रवासही १५ हजार किलोमीटरवरून ७ हजार किलोमीटरवर आला आहे. रामटेक आगारातही अशीच स्थिती आहे. येथे ४५ बसेसपैकी फक्त २० बसेस चालविल्या जात आहेत. रोज होणारा १५ ते १४ हजार किलोमीटरचा प्रवास ८ हजार किलोमीटरखाली आला आहे. उत्पन्नही १ लाख ४० हजारावर आले आहे.

...

उत्पन्न घसरले दीड लाखावर

उमरेड आणि रामटेक या दोन आगाराचे रोजचे उत्पन्न चार लाख रुपयांवर होते. मात्र या दोन्ही ठिकाणचे उत्पन्न आता जेमतेम दीड लाख रुपयांवर आले आहे. ग्रामीण भागातील शाळा बंद आहेत. प्रवाशांची संख्या घटली आहे. शाळा बंद असल्याने फेऱ्या तोट्यात चालवून रिकाम्या बसेस चालविण्यापेक्षा ६० टक्के बसेस बंद करण्याचा निर्णय विभाग नियंत्रकांनी घेतला आहे.

...

मागील वर्ष तोट्याचेच

या दोन्ही आगारासह सर्वच आगारांना मागील वर्षभरात तोटाच आला. उमरेड आणि काटोलमध्ये ग्रामीण फेऱ्या अधिक आहेत. शालेय फेऱ्या ४० टक्के आहेत. शाळा बंद असल्याने वर्षभरापासून ४० टक्के बसेस उभ्याच आहेत. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला आहे.

...

कोट

प्रवासीसंख्या घटल्याने हा निर्णय दोन्ही आगारासाठी घ्यावा लागला. वाहक आणि चालकांना रोज न बोलावता एक दिवसाआड बोलावले जात आहे. वर्षभरापासून येथे आर्थिक फटका बसला आहे.

- नरेंद्र बेलसरे, विभागीय वाहतूक नियंत्रक

...