शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : राष्ट्रसंत विचारधारा अभ्यासक्रमाला 'यूजीसी'ची मान्यता मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 23:40 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राष्ट्रसंत विचारधारा अभ्यासक्रमाला अखेर ‘यूजीसी’ची मान्यता मिळणार आहे. यामुळे अभ्यासक्रमाला अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

ठळक मुद्देतुकडोजी महाराजांचा पुण्यस्मरण दिवस प्रशासकीय इमारतीत होणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजनागपूरविद्यापीठातील राष्ट्रसंत विचारधारा अभ्यासक्रमाला अखेर ‘यूजीसी’ची मान्यता मिळणार आहे. यामुळे अभ्यासक्रमाला अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शिवाय ‘पीएचडी’देखील मिळण्यास अडचण येणार नाही. यासंदर्भात लवकरच विद्यापीठाकडून पावले उचलण्यात येणार आहेत.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा अभ्यासक्रम विद्यापीठ पातळीवर सुरू करण्यात आला. त्याला विद्वत् परिषद आणि व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली होती. परंतु, त्या अभ्यासक्रमाला विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परवानगीकरिता पाठवण्यातच आले नाही. विद्यापीठाला कोणताही अभ्यासक्रम सुरू करण्याची स्वायत्तता आहे. परंतु, त्या अभ्यासक्रमाला राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची परवानगी मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसल्याने राष्ट्रसंत विचारधारा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्याने पीएच.डी. पदवीकरिता नोंदणी केल्यास त्या पदवीलादेखील मान्यता मिळण्यात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाला बळकटी मिळण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळणे अनिवार्य असल्याच्या मुद्याकडे श्री गुरुदेव युवा मंचातर्फे लक्ष वेधण्यात आले. अभ्यासमंडळ सदस्य ज्ञानेश्वर रक्षक यांनी ही बाब कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या निदर्शनास आणून दिली. दोन ते तीन महिन्यातच सर्व प्रक्रिया आटोपून मान्यता प्राप्त करुन देण्यात येईल ,असे आश्वासन कुलगुरूंनी दिल्याचे रक्षक यांनी सांगितले.याशिवाय ११ ऑक्टोबर रोजी तुकडोजी महाराजांचा पुण्यस्मरण दिवस हा मानवता दिन म्हणून विद्यापीठात आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम प्रशासकीय इमारतीत होईल. शिवाय महाविद्यालय पातळीवरदेखील आयोजनासाठी पत्र लिहिण्यात येणार आहे.

टॅग्स :universityविद्यापीठnagpurनागपूरRashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराज