थंडीचे दोन बळी

By Admin | Updated: January 1, 2015 01:29 IST2015-01-01T01:29:28+5:302015-01-01T01:29:28+5:30

नागपूर रेल्वेस्थानकावर थंडीमुळे एक पुरुष आणि एक महिला असा दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री ३.१० वाजता आणि दुपारी १२.३० वाजता उघडकीस आली आहे.

Two victims of cold weather | थंडीचे दोन बळी

थंडीचे दोन बळी

नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर थंडीमुळे एक पुरुष आणि एक महिला असा दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री ३.१० वाजता आणि दुपारी १२.३० वाजता उघडकीस आली आहे.
नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ४ वर रामझुल्याच्या खाली एका ५० ते ५५ वयोगटातील इसमाचा मृतदेह पडून असल्याची माहिती उपस्टेशन व्यवस्थापकांनी लोहमार्ग पोलिसांना दिली. लोहमार्ग पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविला आहे. मृतकाचा चेहरा लांबट, रंग सावळा, उंची ५ फूट, उजव्या हातावर शामराव असे गोंदलेले आहे. दुपारी १२.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक ४ वर ६० ते ७० वयोगटातील एका महिलेचा मृतदेह पडून असल्याची माहिती उपस्टेशन व्यवस्थापकांनी लोहमार्ग पोलिसांना दिली. संबंधीत महिलेची उंची ५ फूट २ इंच, सडपातळ बांधा, रंगाने सावळी, कथ्या-पांढऱ्या रंगाचा हाफशर्ट आणि गडद हिरव्या रंगाची काळ््या पट्याची साडी घातली आहे. दोन्ही मृत्यू थंडीमुळे झाल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. पुढील तपास सहायक उप निरीक्षक सत्यनारायण तिवारी करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Two victims of cold weather