शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांचे परवाने रद्द

By admin | Updated: December 23, 2015 03:41 IST

केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या एफआरपीनुसार साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना रक्कम देणे आवश्यक आहे.

एफआरपीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणारनागपूर : केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या एफआरपीनुसार साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना रक्कम देणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी १३० कारखान्यांनी एफआरपी दिली. ज्यांनी अद्याप एफआरपी दिली नाही, अशा कारखान्यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांनी दोन दिवसात एफआरपी दिली नाही तर त्यांचे परवाने रद्द केले जातील, असे आश्वासन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.एफआरपी देण्याबाबत ८०: २० चा फार्म्युला निश्चित करण्यात आला असला तरी साखरेचे भाव पडल्यामुळे साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत, याकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. पवार म्हणाले, भाव पडत असल्यामुळे व्यापारी अडचणीतील साखर कारखान्यांना पैसे देऊन साखरेचा साठा करीत आहेत. भविष्यात तूर दाळीसारखा साखरेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एफआरपीबाबत सरकार फेरविचार करेल का, असा प्रश्न त्यांनी केला. यावर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्र सरकारच्या नियमानुसार शेतकऱ्याने ऊस देताच त्याला १५ दिवसात १०० टक्के एफआरपी देणे बंधनकारक आहे. मात्र, कोसळणाऱ्या दरांची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन शेतकरी संघटनांशी चर्चा केली. संघटनांनी पहिल्या टप्प्यात ८० टक्के एफआरपी घेणे मान्य केले. राज्य सहकारी बँकेनेही मूल्यांकन वाढविले. खरेदी कर माफ करण्यात आला. एवढे करूनही एफआरपी दिली जात नसेल तर कारवाईशिवाय पर्याय राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब थोरात यांनी एफआरपीचा फार्म्युला बदलण्याची मागणी केली. यावर पाटील यांनी एफआरपी केंद्र सरकार निश्चित करीत असल्याचे सांगत एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्ली येथे पंतप्रधानांच्या भेटीसाठी नेले जाईल व त्यांच्याकडे तशी मागणी केली जाईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले. २०१४-१५ च्या हंंगामातील एफआरपीनुसार देय ऊस देयक १९ हजार १२० कोटींपैकी १८ हजार ४१८ कोटींची म्हणजे ९७ टक्के देयके देण्यात आली आहेत. २०१५-१६ च्या हंगामात ९१ सहकारी व ७४ खासगी असे एकूण १६५ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केलेला असून १५ डिसेंबर २०१५ अखेर २२६.५९ लाक मे.टन उसाचे गाळप होऊन सरासरी १०.१३ टक्के साखर उताऱ्याने २२९.६४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असल्याचेही पाटील यांनी सांगितले.(प्रतिनिधी)