शहरं
Join us  
Trending Stories
1
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
2
Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर धडाम! कालच्या तेजीनंतर आज किमतीत घसरण, पाहा लेटेस्ट रेट
4
घटस्फोटाच्या केस दरम्यान पतीने केलं किळसवाणं कृत्य; पत्नीने पोलिसांना आपबिती ऐकवताच सगळे हादरले
5
नीट पेपरफुटीचे पुणे कनेक्शन, तरुणीसह तिघांना घेतले ताब्यात; शुभमच्या चौकशीतून लोखंडेचे नाव समोर 
6
Video - सेल्स गर्लचा १.६६ कोटींवर डल्ला! सोन्याच्या दागिन्यांनी भरले खिसे, मालकाला घातला गंडा
7
या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा
8
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
9
शनी जयंती २०२६: कर्माचा हिशोब अन् धनाची आवक; 'या' राशींसाठी १६ मे ठरणार गेम-चेंजर!
10
Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
11
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
12
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
13
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
14
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
15
पेपरफुटीचे कनेक्शन केरळ व्हाया राजस्थान; ‘प्रायव्हेट माफिया’ ग्रुपवरून व्हायरल झालेली गेस पेपरची फाइल मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत मॅच
16
अपघात की कट? लग्नानंतर १४ व्या दिवशीच नववधूसोबत आक्रित घडलं; नवरा संशयाच्या भोवऱ्यात
17
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
18
Share Market: शेअर बाजाराचं जोरदार पुनरागमन! Sensex ४२६ अंकांनी वधारला; फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये जबरदस्त तेजी
19
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
20
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
Daily Top 2Weekly Top 5

मुंडण करून पत्नीला दोन महिने डांबले सिगारेटचे चटके

By admin | Updated: May 9, 2014 00:08 IST

घुग्घुस (चंद्रपूर) : नवविवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. तिला सिगारेटचे चटके दिले. एवढ्यावर हा पती महाशय थांबला नाही,

 दोन महिलांनी केली सुटका

घुग्घुस (चंद्रपूर) : नवविवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. तिला सिगारेटचे चटके दिले. एवढ्यावर हा पती महाशय थांबला नाही, तर चक्क तिच्या डोक्यावरचे केस कापून तिला दोन महिने घरात डांबून ठेवले. शेजारच्यांना हा प्रकार लक्षात येऊ नये, यासाठी सुरक्षा भिंतीलाही कुलूप लावून डाबरमन कुत्र्याला रखवालदार म्हणून ठेवले. मात्र माहेरी ही बाब लक्षात येताच त्यांनी दोन महिला व पोलिसांच्या सहकार्याने नवविवाहितेची सुटका केली. घुग्घुस पोलिसांनी आरोपी पती भास्कर ठवसे (४२) याला अटक केली आहे. विशेष म्हणजे, त्याचे सहा वेळा लग्न झाल्याची माहिती आहे. घुग्घुस केमिकल वॉर्डात राहणारा व लॉयड मेटलमध्ये सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत असलेला भास्कर ठवसे याची आतापर्यंत सहा लग्न झाली.

मात्र त्याच्या विकृत मानसिकतेमुळे आधीच्या सर्व पत्नी त्याला सोडून गेल्या. आता चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील एका गावच्या २२ वर्षीय मुलीशी दोन महिन्यापूर्वी त्याने लग्न केले. लग्नानंतर आठ दिवस सुखात घालविले. त्यानंतर त्या पती महाशयाने नवविवाहित पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन दररोज मारहाण, सिगारेटचे चटके देऊन मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरू केले. दरम्यान, त्याने आपल्या पत्नीच्या डोक्यावरील केसही कापून टाकले. आपण करीत असलेले कृत्य इतरांना कळू नये, म्हणून त्याने घराचे दरवाजे व खिडक्या कुलूपबंद केले आणि तिच्याकडे कुणी येऊ नये, याची काळजी घेत सुरक्षा भिंतीच्याही गेटला कुलूप ठोकले. तरीही ती पळून जाऊ नये, याकरिता डाबरमन कुत्रा रखवालदार म्हणून तिथे तैनात ठेवूनच तो कामावर जायचा. काही दिवसांपूर्वी तिचे वडील तिला भेटण्याकरिता आले. त्यावेळी आपल्या मुलीला जावयाने कोंडून ठेवल्याचे पाहून ते गावाकडे परत गेले. मुलीचा होणार्‍या छळाचा धक्का बसून ते आजारी पडले.

शेवटी बुधवारी त्या नवविवाहितेची आई चंद्रपूरच्या दोन महिलांना सोबत घेऊन घुग्घुसमध्ये आली. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्या ममता खैरे व सामाजिक महिला कार्यकर्त्या रेखा गेडाम यांच्यासह लॉयड मेटलच्या गेटवर गेल्या. याबाबत पोलिसांनाही पूर्वसूचना दिली. लॉयड मेटलमधून आरोपी भास्करला बोलाविले व मुलीला भेटण्याची विनंती केली. मात्र त्याने घरी येण्यास नकार दिला. पोलिसांना बोलविण्याची धमकी देताच महिलांना घेऊन तो घरी आला. नवविवाहितेची अवस्था पाहून सर्वच थक्क झाले. त्यांनी लगेच तिची सुटका केली. त्यानंतर घुग्घुस ठाणेदार मनीष ठाकरे यांनी प्रकरण गांभीर्याने घेऊन रात्री उशिरा तक्रार दाखल करून भादंवि ४९८, ३२३, ३२४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. आरोपी भास्करला अटक केली. (वार्ताहर)