शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

स्टील उद्योग अडचणीत

By admin | Updated: June 8, 2015 02:45 IST

अन्य राज्यांमधील वीजदरांमधील फरक, काही राज्यांची मक्तेदारी, रुपयांच्या अवमूल्यनामुळेकच्च्या मालाच्या स्रोतांचा अभाव, ..

वीज व कच्च्या मालाची दरवाढ : प्रवेश करामुळे दिलासामोरेश्वर मानापुरे नागपूरअन्य राज्यांमधील वीजदरांमधील फरक, काही राज्यांची मक्तेदारी, रुपयांच्या अवमूल्यनामुळेकच्च्या मालाच्या स्रोतांचा अभाव, अव्यवहार्य स्पर्धा या सगळ्या गोष्टी राज्यातल्या स्टील उद्योगाच्या मुळावर आल्या असून उद्योजकच नव्हे तर हजारो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.विविध करांच्या दबावामुळे राज्यातील हजारो उद्योग अडचणीत आले आहेत. अर्ध्याधिक रोलिंग मिल (स्टील प्रकल्प) बंद पडल्या आहेत. या उद्योगांना पुन्हा उभारी देण्यासाठी शासनाने सकारात्मक धोरण राबविण्याची गरज असल्याचे मत या क्षेत्रातील उद्योजकांनी व्यक्त केले. ६० टक्के रोलिंग मिल बंदराज्यात नागपूर, जालना, नाशिक, पुणे या शहरांत काही वर्षांआधी ६०० पेक्षा जास्त रोलिंग मिल तर १० हजार छोटेमोठे व्यावसायिक होते. गेल्या चार ते पाच वर्षांत हे प्रमाण अर्ध्यावर आले आहे. ६० टक्के मिल बंद आहेत. उर्वरित ४० टक्के कारखाने त्यांच्या क्षमतेच्या तुलनेत अर्ध्या क्षमतेने काम करत आहेत. स्टीलसाठी मध्यभारतातील मुख्य बाजारपेठ म्हणून विदर्भाची ओळख लयास गेली आहे. यातील बहुतेक जण छत्तीसगडला स्थलांतरित झाले आहेत. अर्थसंकल्पात पाच टक्के प्रवेश कर लागू झाल्यामुळे थोडाफार आधार मिळेल, असा विश्वास विविध स्टील उत्पादकांनी व्यक्त केला. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतील पोलादाची मागणी वाढेल. प्रवेश कर लावल्यानंतर ‘सेट आॅफ’ देण्याचा सरकारचा विचार आहे. हा सेट आॅफ दिला, तर प्रवेश कराचा काहीही उपयोग होणार नाही. बाहेरच्या राज्यातून स्टील येणे सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया स्टील उद्योजक आणि नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी लोकमतला बोलताना दिली. व्हॅट आणि एलबीटीद्वारे वसुलीछत्तीसगड, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त व्हॅट आकारला जातो. शिवाय एलबीटीने दरवाढीत भर टाकली. तीन टक्के व्हॅट तर एक टक्का एलबीटीची वसुली केली जाते. ही वसुली लगतच्या राज्यात नाही. माथाडी कामगारांच्या वेतनवाढीनेही व्यावसायिक त्रस्त असून कामगारांना दुप्पट वेतन द्यावे लागते. अशा स्थितीत कोणते उद्योग भरभराट करू शकेल, असा सवाल अग्र्रवाल यांनी उपस्थित केला.