शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ

By संजय तिपाले | Updated: November 24, 2025 17:22 IST

‘भूपती’चे समर्थन : तीन राज्यांच्या समितीने ठेवला नवा प्रस्ताव, अभियान थांबविण्याची विनंती

गडचिरोली : दंडकारण्यातील सततच्या आक्रमक कारवायांमुळे हादरलेल्या माओवाद्यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे. युध्दबंदीच्या प्रस्ताव फेटाळूल लावत सरकारने आधी आत्मसमर्पण करुन मुख्य प्रवाहात या, असे आवाहन केले होते. दरम्यान, भाकप (माओवादी )पक्षाच्या  महाराष्ट्र- मध्यप्रदेश- छत्तीसगड (MMC) स्पेशल झोनल कमिटीने १५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत मागितली असून तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्मसमर्पणाची तयारी असल्याचा दावा केला आहे. 
  
संघर्षाची लढाई निर्णायक वळणावर असताना माओवाद्यांकडून आलेल्या या नव्या प्रस्तावावर आता सरकार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्र- मध्यप्रदेश- छत्तीसगड (MMC) स्पेशल झोनल कमिटीचा प्रवक्ता अनंत याच्या नावाने जारी झालेल्या २२ नोव्हेंबरच्या पत्रकात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा नामोल्लेख करुन शस्त्र त्यागण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.  पत्रकात म्हटले आहे की, पॉलिट ब्युरो मेंबर भूपती उर्फ सोनू दादा यांनी बदलत्या परिस्थितीचा विचार करुन शस्त्र सोडण्याचा निर्णय घेतला.केंद्रीय समिती सदस्य सतीश दादा व चंद्रन्ना यांनीही आत्मसमर्पण केले. यानुसार महाराष्ट्र- मध्यप्रदेश- छत्तीसगड (MMC) स्पेशल झोनल कमिटीने देखील आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने ३१ मार्चची डेडलाईन दिली आहे, पण आमच्याकडे संपर्क साधने कमी आहेत, त्यामुळे १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंतची मुदत द्यावी, अशी विनंती केली आहे. विश्वास ठेवा, यामागे दुसरा कुठलाही हेतू नाही, असे देखील नमूद केले आहे.
 
माध्यमांनाही केले आवाहन

पत्रकात माध्यमांनाही आवाहन केले असून आमचा संदेश तिन्ही राज्यांपर्यंत पोहोचवावा, आमच्यात शिष्टाई घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माओवादी प्रवक्ता अंनत याने केले आहे. आणखी एक प्रेस नोट जारी करुन आत्मसमर्पणाची नेमकी तारीख कळविली जाईल, असेही त्यात म्हटले आहे.
 
कारवाया थांबविण्याची विनंती

माओवाद्यांचा पीएलजीए सप्ताह यंदा साजरा न करण्याची घोषणा महाराष्ट्र- मध्यप्रदेश- छत्तीसगड (MMC) स्पेशल झोनल कमिटी प्रवक्ता अनंत याने केली आहे. आम्ही सर्व कारवाया थांबवत आहोत, जवानांनी देखील माओवादविरोधी अभियान थांबवावे, अशी विनंती त्याने केली आहे. यातून सरकारला अपेक्षित व सकारात्मकच घडेल, असा विश्वासही त्याने दिला आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Maoists seek time till Feb 15 for surrender: No ulterior motive.

Web Summary : Maoists offer surrender, requesting time until February 15th. They've appealed to Maharashtra, Chhattisgarh, and Madhya Pradesh CMs, halting activities, and asking forces to do the same, assuring no ulterior motive.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीCrime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोलीnagpurनागपूर