शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

एफसीआयच्या कार्यकारी संचालकांना तंबी

By admin | Updated: February 28, 2015 02:25 IST

वेतन करारातील तांत्रिक बाबींमुळे फुड कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे हमाल दर महिन्याला चार लाख रुपयांवर कमाई करीत असल्यामुळे सार्वजनिक निधीचे प्रचंड नुकसान होत आहे.

नागपूर : वेतन करारातील तांत्रिक बाबींमुळे फुड कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे हमाल दर महिन्याला चार लाख रुपयांवर कमाई करीत असल्यामुळे सार्वजनिक निधीचे प्रचंड नुकसान होत आहे. यासंदर्भात वारंवार वेळ देऊनही उत्तर सादर न केल्यामुळे ‘एफसीआय’च्या पश्चिम विभागीय कार्यकारी संचालकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक आदेश जारी करून तंबी दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, कार्यकारी संचालकांना उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून ११ मार्चपर्यंत वेळ देण्यात आला आहे. या कालावधीत उत्तर सादर न केल्यास त्यांना न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित राहून आदेशाच्या अवमानाची कारवाई का करण्यात येऊ नये यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. याप्रकरणाची न्यायालयाने स्वत:हून दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालयीन मित्र आहेत. नागपूर येथील फुड कॉर्पोरेशन आॅफ इंडियातील कामगारांच्या संघटनेने संपाची भीती दाखवून हमालांचे वेतन व इतर भत्ते अव्वाच्यासव्वा वाढवून घेतले आहेत. यामुळे शासकीय निधीचे नुकसान होत आहे. अधिकारी यासंदर्भात मूग गिळून गप्प आहेत. चांगली कमाई करणारे हमाल ७ ते ८ हजार रुपये प्रती महिन्याप्रमाणे भाड्याने कामगार आणतात. वेतन करारातील तांत्रिक बाबींमुळे हमालांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जातो. यामुळे त्यांचे वेतन लाखो रुपयांनी वाढते, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेतील प्रतिवादींमध्ये केंद्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव, राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे सचिव, एफसीआयचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पश्चिम विभागाचे कार्यकारी संचालक, महाराष्ट्राचे महाव्यवस्थापक, क्षेत्रीय व्यवस्थापक आणि महाराष्ट्र माथाडी हमाल मंडळ यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)