शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कर्ज प्रकरणाने बँक अधिकारी अडचणीत

By admin | Updated: November 14, 2016 02:37 IST

बँकेत बनावट कागदपत्रे सादर करून पत्नीच्या नावे दहा लाखांचे कर्ज उचलणाऱ्या रजनीश अयोध्याप्रसाद सिंह (वय ४३, रा. त्रिमूर्तीनगर)

पत्नीची तक्रार : पतीसह बँक अधिकाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल नागपूर : बँकेत बनावट कागदपत्रे सादर करून पत्नीच्या नावे दहा लाखांचे कर्ज उचलणाऱ्या रजनीश अयोध्याप्रसाद सिंह (वय ४३, रा. त्रिमूर्तीनगर) याच्याविरुद्ध सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, या प्रकरणात रजनीशला मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एचडीएफसी बँक आणि युको बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही गुन्हे दाखल केल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे. आरोपी रजनीश याचे त्याच्या पत्नीसोबत पटत नाही. त्यामुळे त्याची पत्नी सुनीता रजनीश सिंह (वय ४०) या काटोल मार्गावरील उत्कर्षनगरात राहतात. १२ मे २०१६ ला आरोपी रजनीशने सुनीता यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. त्यावर सुनीता यांच्या बनावट सह्या करून १० लाखांचे व्यक्तिगत कर्ज (पर्सनल लोन) उचलले. आरोपीने ही कर्जाची रक्कम परस्पर युको बँकेच्या आपल्या खात्यात वळती करून वापरली. (प्रतिनिधी)सारेच संशयास्पद १० लाखांचे कर्ज ज्या व्यक्तीच्या नावे दिले जाते, त्या व्यक्तीला बँक अधिकाऱ्यांनी कधीही विचारणा केली नाही. ती व्यक्ती कर्जाची रक्कम मिळवण्यासाठी बँकेत हजर झाली नाही. तरीसुद्धा बँक अधिकाऱ्यांनी १० लाखांसारखे मोठे कर्ज देताना कागदपत्रांची, सह्याची शहानिशा केली नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, ही रक्कम नंतर एचडीएफसीतून युको बँकेच्या खात्यात वळती करण्यात आली. या सर्व बाबी सुनीता यांना संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्यांनी गुन्हेशाखेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली. प्रदीर्घ चौकशीनंतर सदर पोलीस ठाण्यात रजनीश सिंह याच्यासोबतच पोलिसांनी एचडीएफसी आणि युको बँकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.