शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींनी केला आदिवासी विभागाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 21:22 IST

जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात काटकसर करण्याच्या परिपत्रकाचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर शासकीय कार्यक्रम साजरा करण्यासाठी आदिवासी समाजाकडून शासनास भिक स्वरूपात गोळा झालेली ११४ रुपयाची रक्कम प्रकल्प अधिकारी यांना सुपूर्द करण्यात आली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात काटकसर करण्याच्या परिपत्रकाचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर शासकीय कार्यक्रम साजरा करण्यासाठी आदिवासी समाजाकडून शासनास भिक स्वरूपात गोळा झालेली ११४ रुपयाची रक्कम प्रकल्प अधिकारी यांना सुपूर्द करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाने ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून घोषित केला. यानिमित्त विभागाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. परंतु यंदा कोरोनामुळे कार्यक्रमात काटकसर करण्यात यावी, यासंदर्भात आदिवासी विकास विभागाने परिपत्रक काढले. संघटनांचे म्हणणे आहे की, एकीकडे आलिशान गाड्या खरेदी करण्यासाठी तात्काळ मंजुरी व शासन निर्णय काढण्याची तत्परता शासनाने दाखविली आणि आदिवासींची अस्मिता जपण्यासाठी काटकसर करण्याचे परिपत्रक काढले. याचा निषेध म्हणून व काटकसर करताना किमान महापुरुषांना तरी हार अर्पण करण्यात यावा, यासाठी भीक मागून ११४ रुपयांचा गोळा केलेला निधी सहा. प्रकल्प अधिकारी भोंगाडे यांना सोपविण्यात आला. तसेच संघटनेच्यावतीने काही प्रलंबित मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. त्या पूर्ण न झाल्यास जागतिक आदिवासी दिनाला काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी दिनेश शेराम, श्याम कुमरे, विजय परतेकी, स्वप्निल मसराम, सुरेंद्र नैताम, यश मसराम, हर्षला कुमरे, ज्योती आडे, रामभाऊ आत्राम, दिवेश धूर्वे, संतोष आत्राम, प्रमोद उईके आदी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनTrible Development Schemeआदिवासी विकास योजना