शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Nagpur; जयपूूरमध्ये अडकलेली महिला सुखरुप पोहोचली नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 13:13 IST

चुकीच्या गाडीत बसल्यामुळे जलालखेडा येथील एक महिला जयपूरला पोहोचली. रेल्वे वाहतूक बंद झाल्यामुळे ही महिला आपल्या दोन वर्षांंच्या चिमूकल्यासह जयपूर रेल्वेस्थानकावर अडकली. परंतु जयपूरच्या स्टेशन व्यवस्थापकांनी या महिलेची दखल घेऊन तिला अनुव्रत एक्स्प्रेसने नागपुरला पाठविले.

ठळक मुद्देसोबत होता दोन वर्षाचा चिमुकलाअनुव्रत एक्स्प्रेसने आले नागपूर रेल्वेस्थानकावर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चुकीच्या गाडीत बसल्यामुळे जलालखेडा येथील एक महिला जयपूरला पोहोचली. रेल्वे वाहतूक बंद झाल्यामुळे ही महिला आपल्या दोन वर्षांंच्या चिमूकल्यासह जयपूर रेल्वेस्थानकावर अडकली. परंतु जयपूरच्या स्टेशन व्यवस्थापकांनी या महिलेची दखल घेऊन तिला अनुव्रत एक्स्प्रेसने नागपुरला पाठविले.जलालखेडा येथील एक ३२ वर्षांंची महिला रविवारी नागपूर रेल्वेस्थानकावर आली. या महिलेला रेल्वेगाडी क्रमांक १२५७८ म्हैसुर-दरभंगा या गाडीने दरभंगा येथे जायचे होते. याच वेळी बाजुच्या प्लॅटफार्मवर रेल्वेगाडी क्रमांक १२९७५ म्हैसुर-जयपूर लागली होती. चुकीने ही महिला म्हैसुर-जयपूर एक्स्प्रेसमध्ये बसली. चुकीने ती जयपूरला पोहोचली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने वाहतुक बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही महिला आपल्या दोन वर्षांच्या चिमूकल्यासह जयपूर रेल्वेस्थानकावरच अडकली होती. ही बाब जयपूरच्या स्टेशन व्यवस्थापकांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच या महिलेची दखल घेतली. सध्या ठिकठिकाणी अडकून पडलेल्या रेल्वेगाड्या आपल्या मुळ स्थानकांवर रिकाम्या जात आहेत. त्यामुळे जयपूरच्या स्टेशन व्यवस्थापकांनी पुढाकार घेऊन नागपूरमार्गे रिकाम्या जात असलेल्या रेल्वेगाडी क्रमांक १२६३२ बीकानेर-मदुराई अनुव्रत एक्स्प्रेसमध्ये या महिलेला बसवून दिले. बुधवारी दुपारी ३.४५ वाजता ही महिला नागपूर रेल्वेस्थानकावर उतरली. उतरताच रेल्वेस्थानकावर उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयातील उपस्टेशन व्यवस्थापक अतुल श्रीवास्तव यांनी या महिलेचे आणि तिच्या मुलाचे तापमान घेतले. त्यांची प्रकृती सामान्य असल्यामुळे त्यांना रेल्वेस्थानकाच्या बाहेर सोडण्यात आले.महिलेला घेण्यासाठी जयपूरला गेला दुचाकीनेजयपूर रेल्वेस्थानकावर आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्यासह अडकून पडल्यानंतर या महिलेने जलालखेडा येथील आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर या महिलेच्या आत्याचा मुलगा दुचाकीने जयपूरला गेला. परंतु तेथील स्टेशन व्यवस्थापकांनी या तिघांनाही अनुव्रत एक्स्प्रेसने पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्या जवळील दुचाकीही अनुव्रत एक्स्प्रेसमध्ये टाकून त्यांना नागपुरला रवाना करण्यात आले. नागपूर रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर तिघेही दुचाकीने जलालखेडाकडे रवाना झाले. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस