शहरं
Join us  
Trending Stories
1
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
2
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
3
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
4
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
5
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
6
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
7
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
8
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
9
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
10
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
11
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
12
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
13
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
14
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
15
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
16
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
17
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
18
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
19
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीतील २९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By admin | Updated: May 28, 2014 00:57 IST

नागपुरातील २९ पोलीस निरीक्षकांसह राज्यातील ४९२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची यादी अखेर आज जाहीर झाली. नागपुरातून बदल्या झालेल्यांमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सहा,

पुरंदरे, हिवरे, रेड्डीवार, नंदनवार, जाधव, बद्रे यांचाही समावेश

नागपूर : नागपुरातील २९ पोलीस निरीक्षकांसह राज्यातील ४९२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची यादी अखेर आज जाहीर झाली. नागपुरातून बदल्या झालेल्यांमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सहा, जात पडताळणी विभागातील पाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील चार, गुन्हे व वाहतूक आणि लोहमार्ग दलातील प्रत्येकी दोन पोलीस निरीक्षकांचाही समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस निरीक्षकांना बदल्यांची प्रतीक्षा होती.

पोलीस प्रशिक्षण केंद्रातील बाजीराव बाळासाहेब कळंबे यांची ठाणे ग्रामीणला, अशोक हरिभाऊ पवार यांची नागपूर शहरात, श्रीकांत रेवणसिंग धरणे ठाणे शहरात, कैलास संपतराव तानकर नागपूर ग्रामीण, प्रभाकर गुलाबराव तिक्कस चंद्रपूर तर, राजेंद्र रामनाथ नागरे यांची भंडारा येथे बदली झाली.

अभय रामराव पान्हेकर यांची लोहमार्ग नागपूर, संजय भिकाजी पांडे यांची नागपूर शहर, अविनाश विष्णुपंत करमरकर - राज्य गुन्हे अन्वेषण, राहुल योगिराज पाटील - नागपूर शहर आणि युवराज मारुती मोहिते यांची सांगलीला बदली करण्यात आली. वाहतूक शाखेतील रमेश रामभाऊ बद्रे यांची अमरावतीला, दुगभाई शेख - अहमदनगर, माणिकराव ज्ञानदेव जाधव - ठाणे शहर, गुन्हे शाखेच्या कमल जाधव - अमरावती, सुनील शिंदे पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर, अरविंद आडके धुळे, पोलीस आयुक्तालयातील रामचंद्र मारुती काटोले यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर, बाजीराव भोळे यांची पुणे शहरात, विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील दिलीप मसराम यांची नागपूर ग्रामीणला, लोहमार्ग नागपुरातील राजा पवार नागपूर शहरात तर, सुभाष भोये यांची नंदूरबारला बदली झाली आहे. नक्षलविरोधी अभियानातील जमील अहमद शेख आणि अनिल शेवाळे यांची नागपूर एटीएसमध्ये, एसीबीतील संजय पुरंदरे आणि हरिश्‍चंद्र रेड्डीवार यांची नागपूर ग्रामीणला, नरेंद्र हिवरे यांची भंडारा तर, सुधीर नंदनवार यांची नागपूर शहरात बदली करण्यात आली.

सुरेश बुधवंत यांची बदली पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथे झाली आहे. बदली झालेल्या या सर्वांंना लवकरच कार्यमुक्त केले जाणार आहे. (प्रतिनिधी)