शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत तस्करी वाढली!

By admin | Updated: July 3, 2014 00:51 IST

रेल्वे मार्गाने अलीकडच्या काळात गांजा आणि दारूची तस्करी वाढली असून मागील काही महिन्यात अनेकदा मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लोहमार्ग पोलिसांनी गांजा आणि दारू ताब्यात घेतली.

गुन्हेगार होतात फरार : प्रत्येक गाडी तपासण्याची नाही यंत्रणानागपूर : रेल्वे मार्गाने अलीकडच्या काळात गांजा आणि दारूची तस्करी वाढली असून मागील काही महिन्यात अनेकदा मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लोहमार्ग पोलिसांनी गांजा आणि दारू ताब्यात घेतली. परंतु लोहमार्ग पोलीस सतर्क असले तरीसुद्धा प्रत्येक रेल्वेगाडी तपासण्याएवढे मनुष्यबळ त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे गुन्हेगारांचे चांगलेच फावत असून उघडकीस न येता अनेकदा दारू आणि गांजाची तस्करी झाली असण्याची शक्यता आहे.मागील काही महिन्यांपासून रेल्वे मार्गाने दारू आणि गांजाची तस्करी वाढल्याचे उघडकीस आले आहे. अनेकदा लोहमार्ग पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर ते संबंधित रेल्वेगाडीची कसून तपासणी करून गांजा, दारू ताब्यात घेतात. अनेकदा हा मुद्देमाल शौचालयाजवळ ठेवून आरोपी तेथे हजर राहत नाहीत. पोलीस आल्याचे कळताच तेथून ते निघून जातात. पोलिसांच्या अनेक कारवाईत गांजा, दारू हाती लागली. परंतु गुन्हेगारच हाती लागले नसल्यामुळे पुन्हा ते आपल्या कामासाठी सज्ज होत असल्याची स्थिती आहे. लोहमार्ग पोलिसांकडे हवे तेवढे मनुष्यबळ नसल्यामुळे त्यांना नागपूर रेल्वेस्थानकावर येणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीची कसून तपासणी करणे शक्य होत नाही. नेमक्या याच बाबीचा फायदा घेऊन गुन्हेगार रेल्वेमार्गाने गांजा, दारूची तस्करी करीत आहेत. लोहमार्ग पोलिसांना माहिती मिळाली तरच ते संबंधित गाडीची तपासणी करतात. परंतु अनेकदा पोलिसांपर्यंत तस्करी होत असल्याची माहितीच येत नाही. अशा प्रसंगी गुन्हेगार सहजरीत्या दारू, गांजाच्या मुद्देमालाची तस्करी करण्यात यशस्वी होत असल्याची स्थिती आहे. (प्रतिनिधी)