शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

एकल उपयोगाच्या प्लास्टिकवर व्यापाऱ्यांचा २ ऑक्टोबरनंतर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 21:39 IST

कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) एकदाच उपयोगात येणाऱ्या प्लास्टिकच्या विक्रीवर आणि वापरावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देकंपन्यांनी उत्पादन बंद करावे : जागरूकतेचे ‘कॅट’चे आवाहन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण देताना २ ऑक्टोबर गांधी जयंतीपासून प्लास्टिकचा उपयोग न करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला समर्थन देताना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) एकदाच उपयोगात येणाऱ्या प्लास्टिकच्या विक्रीवर आणि वापरावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. देशातील ७ कोटींपेक्षा जास्त किरकोळ व्यापारी कॅटचे सदस्य आहेत, हे विशेष.याकरिता कॅटने सहयोगी कंपनी ऑल इंडियन कन्झुमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन आणि फेडरेशन ऑफ ऑल इंडिया डिस्ट्रीब्यूटर्स असोसिएशनने सर्व कॉर्पोरेट कंपन्यांना २ ऑक्टोबरपूर्वी उत्पादन आणि तयार उत्पादनांची विक्री बंद करण्यासह पर्यायी उत्पादनांची निर्मिती करण्याचे आवाहन केले आहे. कंपन्यांनी एकल प्लास्टिकची निर्मिती बंद केल्यास संपूर्ण देशातील वितरक, होलसेलर, रिटेलर्स आणि अन्य व्यापारी या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यात यशस्वी होतील.संपूर्ण देशात ७ कोटींपेक्षा जास्त किरकोळ व्यापारी आहेत. त्यापैकी ५ लाख व्यापारी एफएमसीजी उत्पादनांचे वितरक म्हणून काम करतात. त्यांच्याशी ३० लाख किरकोळ व्यापारी जुळले आहेत. अखिल भारतीय धर्तीवर बहिष्कार टाकल्यास एकल प्लास्टिक निर्मिती बंद होईल.कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी सांगितले की, एफएमसीजी, ग्राहकोपयोगी वस्तू, दैनिक उपयोगाच्या वस्तू, औषधांचे पॅकेजिंग आदींसाठी उपयोगात येणारे एकल प्लास्टिक पर्यावरणाला घातक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर गंभीर असल्यामुळे त्यांनी लाल किल्ल्यावरून प्लास्टिक बंदीची अप्रत्यक्ष घोषणा केली होती. त्यामुळे उत्पादक, कॉर्पोरेट कंपन्यांनी उत्पादनात अथवा तयार मालाच्या पॅकेजिंगसाठी एकल प्लास्टिकचा उपयोग करू नये.भरतीया म्हणाले, कॅट देशातील ४० हजारांपेक्षा जास्त ट्रेड असोसिएशन आणि फेडरेशनच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना वस्तू नेण्यासाठी प्लास्टिकऐवजी ज्यूट बॅगचा उपयोग करण्यावर जागरूक करण्यात येणार आहे. कॅटने २९ ऑगस्टला दिल्लीत होणाऱ्या सर्व राज्यातील व्यापारी असोसिएशनच्या एका राष्ट्रीय संमेलनात या मुद्यावर चर्चा आणि भविष्यातील धोरण तयार करण्याचे आवाहन केले आहे.एआयपीसीडीएफचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधानांचे आवाहन पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी एफएमसीजी आणि कन्झुमर ड्युरेबल कंपन्यांवर आहे. कारण सामान्यांतर्फे या उत्पादनांचा दैनंदिन जीवनात उपयोग करण्यात येतो. कंपन्यांनी एकल प्लास्टिकसाठी पर्यायी योजना तयार करावी. वितरकांनी अखिल भारतीय स्तरावर पंतप्रधानांच्या आवाहनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी