शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट रस्त्यांनी घटेल टायरचे आयुष्य

By admin | Updated: June 3, 2017 01:38 IST

शहरात झपाट्याने डांबरी रस्ते सिमेंट काँक्रिटचे तयार करण्यात येत आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर पडणार आहे.

अपघाताचीही भीती : डांबरी रस्त्याच्या तुलनेत टिकणार कमी काळ धीरज शुक्ला। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात झपाट्याने डांबरी रस्ते सिमेंट काँक्रिटचे तयार करण्यात येत आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर पडणार आहे. तुम्ही जेवढे वाहन अधिक चालवाल तेवढेच तुमच्या वाहनाच्या टायरचे आयुष्य कमी होत जाईल. डांबरी रस्त्याच्या तुलनेत २०-३० टक्के टायर्स कमी चालतील. तज्ज्ञांच्या मते सिमेंट रोड, डांबर रोडच्या तुलनेत अधिक कडक असतो. तापमानातही सात ते आठ अंशाचा फरक असतो. डांबराच्या तुलनेत सिमेंटचे रस्ते थंड होण्यास तीन ते चार तास अधिक लागतात. गरमी आणि दाब सहन केल्याने घर्षण आणि गरमीमुळे टायर अधिक घासल्या जातात. अधिक दाब आणि गरमीमुळे टायर अचानक फुटू शकतात. वेगवेगळे वाहन आणि आकाराच्या टायर तसेच गुणवत्तेच्या आधारावर तापमान सहन करण्याची क्षमता वेगवेगळी असू शकते. कमाल ५५ ते ६५ डिग्री तापमानच हे टायर सहन करू शकतात. ८९ किलोमीटर रस्त्याचे सिमेंटीकरण ‘लोकमत’ने शहरात किती किलोमीटर रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे करण्यात येत आहेत, याची माहिती घेतली. याबाबत महापालिकेच्या बांधकाम कार्य विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तळेवार यांनी सांगितले की, शहरात सिमेंट रस्त्याचे काम दोन टप्प्यात करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ३० किलोमीटर रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे तयार करण्यात येतील. यात १२ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून १८ किलोमीटर रस्त्याचे काम अपूर्ण आहे. दुसऱ्या टप्प्यात ५९ म्हणजे एकूण ८९ किलोमीटरचे सिमेंटचे रस्ते होतील. अधीक्षक अभियंता तळेवार यानी सांगितले की, डांबराच्या रस्त्यावर देखभालीचा खर्च अधिक येतो. सिमेंटचे रस्ते तयार करण्याचा खर्चही अधिक येतो. परंतु सिमेंटचे रस्ते तयार करण्यासाठी लागणारी किंमत सात वर्षात भरून निघते. त्याचे वयोमान ३५ वर्षे राहते. यामुळे सिमेंटचे रस्ते तयार करण्यात येत आहेत. अपघाताचा धोका गरमीच्या दिवसात डांबर पिघळल्याने वाहन असंतुलित होत नाहीत. परंतु टायरची पकड संपू लागते. रेती, पाणी रस्त्यावर पडलेली असल्यामुळे वाहन रस्त्यावरून घसरते. अशा स्थितीत अपघाताचा धोका डांबर रोडच्या अपेक्षेनुसार सिमेंट रस्त्यावर अधिक वाढतो. लवचिकपणा नाही तज्ज्ञांच्या मते डांबरात ‘फ्लेक्सिबिलीटी’ आणि ‘इलास्टिसिटी’ अधिक राहते. सिमेंट रस्त्यावर मजबुती अधिक असते. अशात डांबर कोणत्याची ऋतूत टायरच्या ग्रीपला पकडून ठेवते. परंतु सिमेंट रोडवर संतुलन राखणे कठीण होते. वाहतुकीमुळे सिमेंटचे रस्ते गुळगुळीत होऊन अपघात होतात. सध्याच नवे तंत्रज्ञान नाही टायर डिलर्सच्या मते नागपुरात सध्या असे टायर उपलब्ध नाहीत ज्यात सिमेंट रोडसाठी विशेष पद्धतीची डिझाईन किंवा विशेष तंत्रज्ञान वापरले आहे. सामान्यपणे कंपन्या ग्रीपमध्ये थोडा बदल करतात. परंतु एकाच पद्धतीने त्यांना तयार करण्यात येते. सिमेंटमध्ये अधिक घर्षण डांबर हे बिटुमॅन या पदार्थामुळे बनत असल्यामुळे त्यात लवचिकता असते. दाब पडल्यास डांबरी रस्ता दबल्या जातो. त्यामुळे टायरवर कमी दाब पडतो. दुसरीकडे सिमेंटचे रस्ते कडक असतात. अशात दाब केवळ टायरवरच पडतो. सिमेंट रोडचे तापमानही सात ते आठ अंश अधिक राहते. सिमेंट रोड उशिराने थंड होतात. घर्षण आणि गरमीमुळे दाबाने टायर गरम होतात. अचानक ब्रेक लावल्यास तापमान वाढते आणि दाबामुळे ते फुटूही शकतात. - डॉ. श्रीकृष्ण ढाले, उप-प्राचार्य व विभाग प्रमुख, सिव्हिल इंजिनिअरींग, प्रियदर्शिनी कॉलेज