शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

ठगबाज रामटेके अडकला

By admin | Updated: January 6, 2016 03:43 IST

सर्वसामान्यांना घरकुलाचे स्वप्न दाखवून शेकडो जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा ठगबाज सुचेत ऊर्फ सुचित रामटेके याच्या अखेर धंतोली पोलिसांनी ....

घरकुलाचे स्वप्न : कोट्यवधीचा गंडानागपूर : सर्वसामान्यांना घरकुलाचे स्वप्न दाखवून शेकडो जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा ठगबाज सुचेत ऊर्फ सुचित रामटेके याच्या अखेर धंतोली पोलिसांनी मंगळवारी मुसक्या बांधल्या. ग्राहक न्यायालयाने त्याच्याविरुद्ध वॉरंट काढला होता. त्यानुसार, त्याला अटक करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. धंतोलीतील न्यू इंग्लिश शाळेजवळ एका बहुमजली इमारतीत ठगबाज रामटेकेने मॅट्रिक्स इन्फ्रा नामक कंपनीचे कार्यालय थाटले. सुलभ किस्तीत आणि स्वस्त किमतीत घर बांधून देण्याचे स्वप्न दाखवत त्याने शेकडो जणांना आपल्या जाळ्यात ओढले. कोट्यवधी रुपये गोळा केल्यानंतर रामटेकेने त्यांना घरे देण्याऐवजी भूलथापा देणे सुरू केले.टाळाटाळीने नागरिक त्रस्त नागपूर : वारंवार वेगवेगळ्या थापा मारणारा रामटेके घर देणार नाही, ही कल्पना आल्यामुळे संबंधितांनी आपली रक्कम परत मागणे सुरू केले. रामटेके प्रत्येकाला वेगवेगळी तारीख देऊन रक्कम परत घेण्यासाठी बोलवायचा. स्वत: मात्र कार्यालयात हजर राहात नव्हता. त्याच्या टाळाटाळीला कंटाळून अखेर अनेकांनी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर रामटेके आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल केले. मात्र, त्याला धंतोलीतील काही पोलिसांची साथ असल्यामुळे तो गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाण्याच्या आवारातून सटकला होता. तेव्हापासून तो फरार होता.एकीकडे धंतोली ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तर दुसरीकडे ठगबाज रामटेकेविरुद्ध काहींनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. ग्राहक न्यायालयातही तो हजर राहात नसल्यामुळे त्याच्याविरुद्ध न्यायालयाने वॉरंट काढला. या पार्श्वभूमीवर, रामटेकेला धंतोली पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. हे कळताच धंतोली ठाण्यात मोठ्या संख्येत पीडित नागरिक गोळा झाले. काहींनी त्याच्या नावाने चांगलाच शिमगा केला. (प्रतिनिधी)