शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रेलरच्या धडकेत तिघांचा मृत्यू

By admin | Updated: August 20, 2014 01:07 IST

भरधाव ट्रेलरने मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या तिघांचा घटनारस्थळीच मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरातील

दुचाकीला धडक : बुटीबोरी - टाकळघाट मार्गावरील घटनाटाकळघाट : भरधाव ट्रेलरने मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या तिघांचा घटनारस्थळीच मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरातील बुटीबोरी - टाकळघाट मार्गावर मंगळवारी सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास घडली.अमोल बंडू घोडे (२५, रा. सिंदी रेल्वे, जिल्हा वर्धा), गजानन चाफले (२४, रा. सिंदी रेल्वे, जिल्हा वर्धा) व शत्रुघ्न सुरेश चौधरी (२८, रा. कवठा, जिल्हा नागपूर) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही एमएच-४०/एक्स-०८५२ क्रमांकाच्या मोटरसायकलने बुटीबोरीहून टाकळघाटकडे जात होते. दरम्यान, बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील शिल्पा कंपनीसमोर भरधाव येणाऱ्या ट्रेलरने मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे तिघेही दूरवर फेकल्या गेले.यात गंभीर जखमी झाल्याने या तिघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर ट्रेलरचालक ट्रेलरसह पळून गेला. परिसरातील नागरिकांनी सदर घटनेची सूचना बुटीबोरी पोलिसांना दिली. माहिती मिळताच बुटीबोरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांच्यासह त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सदर ट्रेलरचा परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यात यश आले नाही. त्यांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन ते उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविले. बुटीबोरी पोलिसांनी ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)