रामटेक : रामटेक तालुक्यात शुक्रवारी (दि. २७) तीन नवीन रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील काेराेना रुग्णांची संख्या ८४२झाली असून, यातील ७५१ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत. शिवाय, ३४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये तालुक्यातील चिचाळा, शीतलवाडी व मनसर येथील प्रत्येकी एक रुग्ण असून, शहरात एकही नवीन रुग्णाची नाेंद करण्यात आली नाही, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}