शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना शिक्षा

By admin | Updated: January 30, 2015 00:47 IST

गोसेखुर्द प्रकल्पामुळे बाधित गावांचे पुनर्वसन करताना न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भंडारा दिवाणी (वरिष्ठ स्तर) न्यायालयाने तत्कालीन जिल्हाधिकारी संभाजीराव सरकुंडे,

न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन : दिवाणी न्यायालयाचा निकालभंडारा : गोसेखुर्द प्रकल्पामुळे बाधित गावांचे पुनर्वसन करताना न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भंडारा दिवाणी (वरिष्ठ स्तर) न्यायालयाने तत्कालीन जिल्हाधिकारी संभाजीराव सरकुंडे, तत्कालीन उपविभागीय अधिकारी आणि सध्या नागपूरचे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे व कार्यकारी अभियंता पी.एन. वाकोडीकर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. गोसेखुर्द प्रकल्पामुळे बाधित खैरी या गावाचे अशोकनगर येथे पुनर्वसन करताना अनियमितता व कायद्याचे उल्लंघन झाले. याप्रकरणी सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामदास पडोळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाने अधिकच्या संपादित जमिनीचा ताबा चार आठवड्यात सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाचे तत्कालीन जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी पालन केले नव्हते. त्यामुळे त्यांना प्रत्येकी दोन हजार रूपयांचा दंड भरावा लागला होता. न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पडोळे यांनी पुन्हा उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने याचिकाकर्ते पडोळे यांच्या जमीन पुनर्वसनाचे काम करण्यासाठी मनाई आदेश दिले होते. या आदेशाला अधिकाऱ्यांनी न जुमानता पुनर्वसनाची कारवाई केली. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने तत्कालीन जिल्हाधिकारी सरकुंडे, उपविभागीय अधिकारी कुंभारे, कार्यकारी अभियंता वाकोडीकर यांना दोषी ठरवून तीन महिन्याची शिक्षा सुनावली आहे. (प्रतिनिधी)