शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरला खंडणी मागणाऱ्या पत्रकारासह तिघांना अटक; वाहनांसह माेबाईल जप्त

By जितेंद्र ढवळे | Updated: June 6, 2024 23:36 IST

पाेलिस उपायुक्तांच्या विशेष पथकाची कारवाई

(नागपूूर) कामठी : नागपूर शहरातील बिल्डरला पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पत्रकारासह तिघांना पाेलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यांच्याकडून कार, माेटारसायकल व माेबाइल फाेन जप्त केले आहेत. ही कारवाई कामठी-कळमना मार्गावरील मरारटाेली परिसरात गुरुवारी (दि. ६) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

वीरकुमार दिनसिंह (३०, रा. संताजीनगर, कन्हान, ता. पारशिवनी), शेख हबीब शेख रहमतुल्ला (३४, रा. पटेलनगर, कन्हान, ता. पारशिवनी) व सय्यद रिजवान हैदर सय्यद अस्वर अली रिजवी (५०, रा. सैलाबनगर, कामठी) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. सचिन गोपाल गुप्ता (४५, रा. जीपीओ चाैक, सिव्हिल लाइन, नागपूर) हे केसर लँड बिल्डर्स नामक फर्मचे मालक आहेत. वीरकुमारसह अन्य दाेघे न्यू आवाज न्यूज या यू-ट्यूब चॅनेलचे प्रतिनिधी आहेत.

सचिन गुप्ता यांनी कन्हान शहरातील पांदण रस्त्यावर ले-आउट टाकून भूखंड विकल्याचा आराेप करीत तिघांनी त्यांना १० लाख रुपयांची मागणी केली हाेती. त्यामुळे सचिन यांनी १७ मे राेजी तिघांच्या विराेधात कामठी (नवीन) पाेलिस ठाणे व पाेलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्याकडे तक्रार केली हाेती. पैसे मागणीचा तगादा वाढल्याने पाेलिसांनी तीन दिवसांपासून सापळा रचला हाेता. तिघेही गुरुवारी दुपारी मरारटाेली भागात आले. त्यांनी सचिन गुप्ता यांच्याकडून पाच लाख रुपये स्वीकारताच पाेलिसांनी तिघांनाही ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी भादंवि ३८४, ३८६, ५०६, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

शासकीय अधिकारीही ब्लॅकमेलिंगचे बळीपाेलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सचिन गुप्ता यांनी वीरकुमारला पाच लाख रुपये असलेली नाेटांची पिशवी दिली. त्यात एक लाख रुपयांच्या नाेटा असली तर चार लाख रुपयांच्या नाेटा नकली हाेत्या. पाेलिसांनी वीरकुमारची एमएच-४९/यू-६८४५ क्रमांकाची हाेंडा सिटी कार, इतर दाेन आराेपींची एमएच-४०/एवाय-३४६२ क्रमांकाची माेटारसायकल व तीन माेबाइल फाेन जप्त केले. वीरकुमारने यापूर्वी अनेकांकडून खंडणी वसूल केली आहे. यात शासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याच्या विराेधात कन्हान पाेलिस ठाण्यात गुन्ह्यांची नाेंद आहे, अशी माहिती तपास अधिकारी तथा पाेलिस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी दिली. त्याच्याकडून ब्लॅकमेलिंगच्या इतर घटना उघड हाेण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.