शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जामिनावर सुटताच पुन्हा दिली अत्याचाराची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 22:17 IST

बलात्कार आणि अपहरणाच्या प्रकरणातून जमानतीवर सुटका होताच दिवसाढवळ्या भर रस्त्यावर पीडित बालिकेला अडवून तिच्या बहिणीवर अत्याचार करण्याची धमकी देण्याचा प्रकार उजेडात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बलात्कार आणि अपहरणाच्या प्रकरणातून जमानतीवर सुटका होताच दिवसाढवळ्या भर रस्त्यावर पीडित बालिकेला अडवून तिच्या बहिणीवर अत्याचार करण्याची धमकी देण्याचा प्रकार उजेडात आला आहे. ही घटना मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.आरोपीचे नाव करण कांबळे (२२ वर्षे) असून तो अपराधी वृत्तीचा आहे. त्याने दोन वर्षापूर्वी या १७ वर्षीय विद्यार्थिनीची अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत छेड काढली होती. पोलिसात तक्रार झाल्यानंतर काही दिवसांनी त्याने या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला होता. या घटनेनंतर दाखल केलेल्या दुसऱ्या तक्रारीवरून करणवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अलीकडे महिनाभरापूर्वीच त्याची जमानतीवर सुटका झाली होती.दरम्यान, मंगळवारी दुपारी औषध खरेदीसाठी दुकानात जाताना करणने तिला पकडले. आपल्याविरुद्धची तक्रार परत न घेतल्यास तिच्या बहिणीवर अत्याचार करण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर चार महिन्यानंतर ती कायद्यानुसार सज्ञान झाल्यावर तिच्यासोबत कोर्टात लग्न करण्याची धमकीही त्याने दिली. हा प्रकार मुलीने आईवडिलांना सांगितल्यावर त्याला जाब विचारला. मात्र त्यांनाही करणने मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे हे कुटुंब दहशतीखाली आले आहे. पोलिसांनी छेडखानी, धमकी, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर करण फरार झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार