लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण पूर्व मध्य अंतर्गत ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान भूपदेवपूर-रॉबर्टसन सेक्शनमध्ये थर्ड लाईनचे काम सुरू असल्यामुळे रेल्वे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. या कालावधीतील आठ रेल्वे गाड्या रद्द करण्याचा आणि सात गाड्या ‘शॉर्ट टर्मिनेट’करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार २२८४५ पुणे -हटीया एक्स्प्रेस १५ व १५ सप्टेंबरला, २२८४६ हटिया- पुणे एक्स्प्रेस १६ व २० सप्टेंबरला रद्द राहील. १९३१७ इंदोर-पुरी एक्स्प्रेस आणि १९३१८ पुरी-इंदोर एक्स्प्रेस १७ सप्टेबरला, १२७६७ नांदेड-शालीमार एक्स्प्रेस २३ सप्टेबरला, १२७६८ शालीमार-नांदेड एक्स्प्रेस २५ सप्टेबरला, १३४२६ सूरत-माल्दा एक्स्प्रेस २३ सप्टेबरला, १३४२५ मालदा-सूरत एक्स्प्रेस २८ सप्टेंबरला रद्द राहील.५८११७/५८११८ झारसुगुडा-गोंदिया-झारसुगुडा पॅसेंजर ११ ते २७ सप्टेंबर दरम्यान झारसुगुडा ते बिलासपूर दरम्यान रद्द राहील. ५८१११ टाटानगर-इतवारी पॅसेंजर १६ ते २७ दरम्यान झारसुगुडा ते इतवारी दरम्यान रद्द राहील. ५८११२ इतवारी -टाटानगर पॅसेंजर १५ ते २६ दरम्यान इतवारी ते झारसुगुडा दरम्यान रद्द राहील. १२४१० निजामुद्दीन -रायगढ गोंडावाना एक्स्प्रेस २३ ते २६ दरम्यान बिलासपूर-रायगढ दरम्यान रद्द राहील. १२४०९ रायगढ-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस २५ ते २८ सप्टेंबरपर्यंत रायगढ-बिलासपूर दरम्यान रद्द राहील. याशिवाय १२२६१ मुंबई-हावडा दुरांतो एक्स्प्रेस १५, १७ व १८ सप्टेंबरला मुंबईहून ४.३० तास, १२२२१ पुणे - हावडा दुरांतो २३ सप्टेंबरला ४.३० तास आणि १२८८० भुवनेश्वर-कुर्ला एक्स्प्रेस १७ सप्टेंबरला नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशिरा रवाना होईल.
थर्ड लाईनमुळे सप्टेंबर महिन्यात रेल्वे प्रवाशांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 11:49 IST
दक्षिण पूर्व मध्य अंतर्गत ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान भूपदेवपूर-रॉबर्टसन सेक्शनमध्ये थर्ड लाईनचे काम सुरू असल्यामुळे रेल्वे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.
थर्ड लाईनमुळे सप्टेंबर महिन्यात रेल्वे प्रवाशांना फटका
ठळक मुद्दे सात गाड्या ‘शॉर्ट टर्मिनेट’आठ गाड्या रद्द