शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

श्रीसूर्याचा ‘थिंक टँक’ गजाआड

By admin | Updated: June 11, 2015 02:49 IST

शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या श्रीसूर्या, वासनकर वेल्थ मॅनेजमेंट आणि रविराज या कंपन्यांचा ‘थिंक टँक’ समजल्या जाणाऱ्या...

न्यायालय : मनोज तत्वादीची कारागृहात रवानगीनागपूर : शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या श्रीसूर्या, वासनकर वेल्थ मॅनेजमेंट आणि रविराज या कंपन्यांचा ‘थिंक टँक’ समजल्या जाणाऱ्या प्रतापनगर येथील मनोज तत्वादी याला बुधवारी सकाळी आर्थिक गुन्हे पथकाने अटक केली. पोलिसांनी तत्वादीला एमपीआयडी कायद्याचे विशेष न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात हजर करून त्याच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. सरकार पक्ष न्यायालयात आरोपीच्या विरोधात ठोस माहिती सादर करण्यास अपयशी ठरल्याने न्यायालयाने पोलीस कोठडी रिमांडची मागणी नामंजूर करून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तत्वादी हा श्रीसूर्याच्या इन्फोटेक आणि हेल्थ केअर या दोन कंपन्यांमध्ये भागीदार असल्याचे एक पत्र सेबीकडून आर्थिक गुन्हे पथकाला प्राप्त होताच त्याला अटक करण्यात आली. त्याचे समीर जोशीसोबत स्टॉक एक्सचेंजमध्ये डिमॅट अकाऊंट असल्याचेही आढळून आले आहे. सूर्यदेव लॉजिस्टिक एज्युकेशन डेव्हलपमेंट कंपनीत स्वत: मनोज तत्वादी, समीर जोशी, प्रशांत वासनकर आणि रविराज कंपनीचा राजेश जोशी हे संचालक आहेत. तत्वादी काळ्या धंद्यांचा सूत्रधार श्रीसूर्याचा ‘थिंक टँक’ गजाआडनागपूर : सूर्यदेव लॉजिस्टिकने एक हॉटेल खरेदी केलेले आहे. तत्वादी हा या सर्व कंपन्यांच्या काळ्या धंद्यांचा मुख्य सूत्रधार आहे. घोटाळ्यांचे प्रशिक्षणच तो देत होता, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याचे घोटाळे चव्हाट्यावर आणण्यासाठी त्याला पुन्हा ताब्यात घेण्याच्या हालचाली आर्थिक गुन्हे पथकाने सुरू केल्या आहेत. दरम्यान न्यायालयाने तत्वादीला न्यायालयीन कोठडी सुनावताच त्याच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु न्यायालय अर्ज फेटाळण्याच्या स्थितीत असतानाच हा अर्ज मागे घेण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. बी. एम. करडे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. देशपांडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)