शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

काटोल मार्गाच्या चौपदरीकरणात दुकाने व घरे जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 9:31 PM

काटोल मार्गाचे चौपदरीकरण करताना जुना काटोल नाका ते नवीन काटोल नाका या मार्गालगत असलेली दुकाने व घरे तोडली जाणार नाही. सध्याच्या डीपी रोडचेच सिमेंटीकरण करण्यात येईल. अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी गिट्टीखदान-बोरगाव-फ्रेन्डस कॉलनी व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाला दिली.

ठळक मुद्देनितीन गडकरी यांची ग्वाही : गिट्टीखदान परिसरातील व्यापाऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काटोल मार्गाचे चौपदरीकरण करताना जुना काटोल नाका ते नवीन काटोल नाका या मार्गालगत असलेली दुकाने व घरे तोडली जाणार नाही. सध्याच्या डीपी रोडचेच सिमेंटीकरण करण्यात येईल. अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी गिट्टीखदान-बोरगाव-फ्रेन्डस कॉलनी व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाला दिली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर देशमुख, नगरसेवक नितीश ग्वालबंशी, हरीश ग्वालबंशी,काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रमोद सिंग ठाकूर, व्यापारी संघाचे महेश खंडेलवाल, राजू खंडेलवाल,पप्पू भय्या यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.जुना काटोल नाका ते फेटरी या दरम्यानच्या मार्गाचे चौपदरीकरण के ल्यास या मार्गालगतची दुकाने, घरे यासोबत संरक्षण व वन विभागाची जागा जागा जाणार आहे. गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाची संरक्षक भिंत तोडावी लागणार आहे. याचा विचार करता फेटरीपर्यंत आहे त्या डीपी रोडचे सिमेंटीकरण करण्यात येईल. त्यापुढे चौपदरीकरण के ले जाईल. अशी ग्वाही गडकरी यांनी दिल्याची माहिती सुधाकर देशमुख यांनी दिली.प्रस्तावित चौपदरीकरण संदर्भात काटोल मार्गावरील प्राचीन हनुमान मंदिरात गेल्या आठवडाभरापासून दररोज व्यापाºयांच्या बैठका होत आहे. गेल्या बुधवारी शहर काँगे्रसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनीही येथील व्यापारी व नागरिकांची बैठक घेतली होती. शुक्रवारी बंदला गिट्टीखदान-बोरगाव फेन्डस कॉलनी व्यापारी संघासोबतचा सर्वपक्षांनी पाठिंबा दर्शवला होता. या आंदोलनात दिलीप खोरगडे, सुरेश गिरडे, नितीन माहुरे, मनोज मदने, अनिल बाजपेयी, हितेश हारोडे, बबली तिवारी, परमात्मा पांडे, हरतीत नरोला, विजय ढोके, नईम भाई, हाजी आसिफ, अंकित नागपाल, राजेश बाली, नंदलाल हिगोरानी, गुरमीत सिंह नरुला, गौरीशंकर खंडेलवाल, इंद्रसेन सिंग ठाकूर, घनश्याम मांगे यांच्यासह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.

 

 

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर