शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनासाठी दबावगट असावा

By admin | Updated: October 10, 2014 01:00 IST

हल्लीच्या मरगळलेल्या वातावरणात राज मेहर यांची कविता खऱ्या अर्थाने कविता वाटतात. प्रस्थापित सौंदर्यशास्त्राच्या बुरसट संकल्पनेला नाकारण्याचे धैर्य कवीने दाखविले आहे. साहित्यात आणि कवितेच्या

भारत पाटणकर : राज मेहर यांच्या दोन काव्यसंग्रहाचे प्रकाशन नागपूर : हल्लीच्या मरगळलेल्या वातावरणात राज मेहर यांची कविता खऱ्या अर्थाने कविता वाटतात. प्रस्थापित सौंदर्यशास्त्राच्या बुरसट संकल्पनेला नाकारण्याचे धैर्य कवीने दाखविले आहे. साहित्यात आणि कवितेच्या क्षेत्रात कवींना अपेक्षित परिवर्तन करायचे असेल तर अशा समविचारी कवींचा एक दबावगट तयार केला पाहिजे, असे मत बाराव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले. निर्मिती विचार मंच, कोल्हापूरतर्फे नागपुरातील राज मेहर यांच्या ‘ओळीनंतरच्या ओळी’ आणि ‘तुझी कविता तुझ्याचसाठी’ या दोन काव्यसंग्रहाच्या द्वितीयावृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. हा कार्यक्रम कोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक भवनाच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. सावित्रीबार्इंच्या जीवनकार्याच्या अभ्यासक अमेरिकेतील लेखिका डॉ. गेल अ‍ॅम्वेट यांच्या हस्ते या दोन्ही आवृत्तींचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. गेल यांनी यावेळी छोटेखानी भाषणातून राज मेहर यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कवितांचे अर्थ समजून घेत त्यांनी या कविता अतिशय प्रगल्भ असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी एका काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. यात अनेक कवींनी कविता सादर केल्या. संचालन प्रसिद्ध कवी किरण भिंगारदिवे यांनी केले. कार्यक्रमाचा प्रारंभ पुस्तकनिर्मितीच्या क्षेत्रातील अनिल म्हमाने यांच्या बीजभाषणाने झाली. डॉ. शिवाजीराव पाटील यांच्या काव्यवाचन व धन्यवाद प्रस्तावाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)