वर्ष उलटूनही स्वाधारचा आधार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST2021-04-07T04:08:31+5:302021-04-07T04:08:31+5:30

स्वाधार योजनेंतर्गत जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी उच्चशिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना निवास, ...

There is no basis for Swadhar even after the year is over | वर्ष उलटूनही स्वाधारचा आधार नाही

वर्ष उलटूनही स्वाधारचा आधार नाही

स्वाधार योजनेंतर्गत जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी उच्चशिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना निवास, भोजन व शैक्षणिक साहित्याचा खर्च भागविण्यासाठी प्रति वर्ष ३५ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. योजनेंतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षात जिल्ह्यात अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना स्वाधारचे अनुदान प्राप्त झाले नाही. त्यामुळे जवळपास १,३०० विद्यार्थी लाभापासून वंचित झाले आहे. विद्यार्थ्यांची कौटुंबिक परिस्थितीत हलाखीची असल्याने त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे स्वाधारचा लाभ विद्यार्थ्यांना तत्काळ देण्यात यावा, अशी मागणी मानवाधिकार संरक्षण मंचचे आशिष फुलझेले, रिपब्लिकन आघाडीचे संजय पाटील, सचिन गजभिये, राजीव खोब्रागडे, भूषण वाघमारे, आशिष तितरे, प्रकाश वाघमारे आदींनी समाजकल्याण उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड यांच्याकडे केली आहे.

Web Title: There is no basis for Swadhar even after the year is over