शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

बाईकच्या चेनमध्ये हाताचा अंगठा अडकून तुटला

By सुमेध वाघमार | Updated: April 20, 2024 20:17 IST

-अंगठ्याच्या पुर्नरोपणाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली यशस्वी

नागपूर : स्पोर्ट्स बाईक सुरू करून चेनला कापडाने ग्रीसिंग करताना अचानक कापड अडकून युवकाचा अंगठा गाडीच्या चेनमध्ये ओढला गेला. परिणामी उजव्या हाताचा अंगठा तुटला. त्याच अवस्थेत त्याला मध्यप्रदेशहून नागपुरात आणले. डॉक्टरांनी वेळ न घालविता अंगठ्याच्या पुर्नरोपणाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. हाताचे प्रतिनिधीत्व करणारा अंगठा वाचवित डॉक्टरांनी त्या युवकाचे भवितव्यही सुरक्षित केले.

मध्यप्रदेशातील २० वर्षीय संजय (बदलेले नाव) हा फार्मसीचा विद्यार्थीे. चार दिवसांपूर्वी सायंकाळी तो आपली स्पोर्टस् बाईक स्वत:च सर्व्हिसिंग करत होता. त्याने गाडी सुरू करून कापडाने चेनला ग्रीस लावत होता. अचानक कापड चेनमध्ये अडकून त्याचा हातही ओडला गेला. त्याचा उजव्या हाताचा अंगठा चेनमध्ये अडकू न अर्ध्यापेक्षा जास्त तुटला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. मज्जातंतूंच्या ऊतींना आणि रक्तवाहिन्यांना गंभीर दुखापत झाली. सुरुवातीला, कुटुंबीयांनी स्थानिक रुग्णालयात धाव घेतली. परंतु, तेथील डॉक्टरांनी नागपुरात नेण्याचा सल्ला दिला. नातेवाइकांनी क्रिम्स हॉस्पिटल्ससोबत संपर्क साधला. रुग्णाची माहिती दिली. डॉक्टरांनी तुटलेल्या अंगठा आणि रुग्णाच्या संदर्भात आवश्यक खबरदारीच्या सूचना दिल्या. हॉस्पिटलमध्ये तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी शस्त्रक्रिया विभागाची चमू, वैद्यकीय पथक कार्यक्षमतेने आणि कौशल्याने कामाला लागले. रात्री रुग्ण पोहचताच कागदपत्रांशी संबंधित कोणताही विलंब टाळून, १० मिनिटांत शस्त्रक्रिया सुरू झाली. अत्याधुनिक सर्जिकल मायक्रोस्कोपचा वापर करून जटिल अशी अंगठ्याची पुनर्रोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. 

-दोन दिवसांनी दिली सुटी  हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक अरबट यांनी सांगितले, उजव्या हाताचा अंगठा नसेल तर दैनंदिन कामकाजासह अनेक छोट्याछोट्या गोष्टी करणे कठीण होतात. रुग्णाच्या नातेवाइकांनी दाखवलेली तत्परता आणि शस्त्रक्रिया विभागाची अचूकता, उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक टीमवर्कमुळे रुग्णाचे भवितव्य सुरक्षित होऊ शकले. शस्त्रक्रियेच्या दोन दिवसानंतर रुग्णाला सुटीही देण्यात आली.

टॅग्स :nagpurनागपूर