थडीपवनीच्या कनिष्ठ अभियंत्याचे वेतन कापणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST2021-03-09T04:10:28+5:302021-03-09T04:10:28+5:30

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील उपविभागीय अभियंता जलालखेडाअंतर्गत थडीपवनी वीज केंद्र येथे कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता प्रज्ञाशील डोंगरे नेहमी कार्यालयात ...

Thadipavani's junior engineer's salary to be cut? | थडीपवनीच्या कनिष्ठ अभियंत्याचे वेतन कापणार ?

थडीपवनीच्या कनिष्ठ अभियंत्याचे वेतन कापणार ?

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील उपविभागीय अभियंता जलालखेडाअंतर्गत थडीपवनी वीज केंद्र येथे कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता प्रज्ञाशील डोंगरे नेहमी कार्यालयात गैरहजर राहतात. त्यामुळे शेतकऱ्यासह स्थानिक वीज ग्राहकांना नेहमी त्रास सहन करावा लागतो. तसेच डोंगरे यांच्या हलगर्जीपणामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोटरपपंचे डिमांडसुद्धा आलेले नाही. याबाबतची तक्रार कार्यकारी अभियंता, काटोल यांच्याकडे करण्यात आली होती. ग्राहकांच्या तक्रारीवरून वरिष्ठ अभियंत्यांनी २३ फेब्रुवारीला थडीपवनी येथील कनिष्ठ अभियंता कार्यालयाला सकाळी १० च्या सुमारास आकस्मिक भेट दिली होती. त्यावेळेस डोंगरे कार्यालयात उपस्थित नव्हते. याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे कामात हयगय केल्याबद्दल एकतृतीयांश वेतन कपात करण्यात येऊ नये, याबाबत डोंगरे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. परंतु या नोटिसीवर डोंगरे यांचे उत्तर मिळाले नाही, अशी माहिती वरिष्ठ कार्यकारी अभियंता, काटोल यांनी दिली आहे.

--

डोंगरेसंदर्भात थडीपवनी भागातील वीज ग्राहकांच्या तक्रारी मला फोनद्वारे प्राप्त झाल्या होत्या. २३ फेब्रुवारी मी थडीपवनी येथे पाहणीसाठी गेलो असता डोंगरे कार्यालयात नव्हते. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

राजेंद्र मळसने

कार्यकारी अभियंता, महावितरण काटोल

-----

मला मुख्यालयी राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मी मुख्यालयी राहत असून, त्याबाबतची सर्व कागदपत्रे कार्यकारी अभियंता काटोल यांच्याकडे सादर करणार आहे.

प्रज्ञाशील डोंगरे

कनिष्ठ अभियंता, थडीपवनी.

Web Title: Thadipavani's junior engineer's salary to be cut?