शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

अंदमान एक्सप्रेस रोखल्याने रेल्वे स्थानकावर तणाव

By नरेश डोंगरे | Updated: July 29, 2024 15:41 IST

किसान आंदोलनाचे कार्यकर्ते : जेवण न मिळाल्याने केला हंगामा

नरेश डोंगरे 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
दक्षिणेतून दिल्लीकडे निघालेल्या किसान आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर ट्रेन रोखली. सुमारे अर्धा ते पाऊण तास आक्रमकता दाखवत आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याने रेल्वेगाडीला विलंब झाला. परिणामी प्रवासीही संतप्त झाल्याने तणाव निर्माण झाला होता. शिर्षस्थ अधिकाऱ्यांनी आंदोलकांची मागणी समजून घेत ती पूर्ण केल्यानंतर वातावरण निवळले.


दक्षिणेतील किसान आंदोलनाचे शेकडो कार्यकर्ते दोन दिवसांपूर्वी दिल्लीला होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले होते. गाडीत त्यांच्या आंदोलक पवित्र्यामुळे त्यांना रविवारी नर्मदापूरममध्ये उतरून देण्यात आले. तेथे त्यांनी जोरदार हंगामा केल्याने नंतर त्यांना गाडी क्रमांक १६०३२ अंदमान एक्सप्रेसमध्ये बसविण्यात आले. आज सकाळी १०.३० च्या सुमारास ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचली. येथे त्यांनी आपल्याला गाडीत जेवण न मिळाल्याची तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचे पाहून आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी गाडीच्या इंजिनवर चढून, आडवे होऊन जोरदार घोषणाबाजी केली. 


सुमारे अर्धा ते पाऊणतास त्यांचे 'गाडी रोखो आंदोलन' सुरू होते. त्यांची रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी समजूत काढत होते. दुसरीकडे गाडीला विलंब होत असल्याने या गाडीतील प्रवासीही संतप्त झाले होते. तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोनोफ्रेण्ड करून आंदोलकांची मागणी समजून घेतली. त्यांना लगेच जेवण उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर गाडी पुढे मार्गस्थ झाली. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीnagpurनागपूरFarmerशेतकरी