शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाखांचा गंडा

By admin | Updated: May 25, 2015 02:56 IST

विदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अजनीतील बहीण भावाला एका टोळीने १० लाखांचा गंडा घातला.

विदेशात नोकरीचे आमिष : अजनीत गुन्हा दाखल नागपूर : विदेशात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अजनीतील बहीण भावाला एका टोळीने १० लाखांचा गंडा घातला. एलिशबा व्हिवीयर डेमोराईज (वय २४) आणि तिचा भाऊ एडमंड अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत. एलिशबा अजनीतील जोशीवाडी (कुकडे लेआऊट) मध्ये राहाते. २ डिसेंबर २०१४ ला दुपारी १ वाजता तिच्या मोबाईलवर एक फोन आला. यूएस मधील एका आॅईल आणि गॅस कंपनीत ‘अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह असिस्टंट मॅनेजरचे पद रिक्त आहे. या पदासाठी लठ्ठ पगार दिला जाणार असून, तुमची तयारी असेल तर आम्ही तुम्हाला नोकरी देऊ शकतो‘, असे पलिकडून बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले. एलिशबाने त्याला प्रतिसाद दिला. त्यामुळे नंतर तिला ७०६६७१३५९७ तसेच १९७२५८६७२४९ क्रमांकाच्या फोनवरून वेळोवेळी फोन येऊ लागले. ई-मेल आयडी दिल्यानंतर त्यावरही संपर्क सुरू झाला. कधी थॉमस वजदा, कधी रोलॅण्ड हाबतोर तर कधी अल्फ्रेड नावाचा व्यक्ती संपर्क करून वेगवेगळ्या सूचना करीत होता. एलिशबाच नव्हे तर तिचा भाऊ एडमण्ड यालाही मेकॅनिकल इंजिनियर म्हणून नोकरी देण्याची बतावणी आरोपींनी केली. त्यांना संबंधित कंपनीच्या नावे बनावट ई-मेल पाठविले. यूएस अ‍ॅम्बेसीतील थॉमस वजदा यांच्या नावाचा गैरवापर करून आरोपी हे सर्व बनवाबनवी करीत होते. त्यांनी बहीण भावाच्या एअर टिकीट, व्हीजा आणि वर्क परमिटकरीता पैसे लागतात म्हणून २ डिसेंबर २०१४ ते १८ मे २०१५ या कालावधीत एलिशबा आणि तिच्या भावाकडून १० लाख, १३ हजार, ७३० रुपये उकळले.(प्रतिनिधी)नुसतीच बनवाबनवीपैसे जमा केल्यानंतर एलिशबा आणि तिचा भाऊ जेव्हा जेव्हा नियुक्तीचा विषय काढायचे, त्या त्या वेळी आरोपी नवीन सबब सांगायचे. पुन्हा नव्याने रक्कम मागायचे. त्यामुळे या बहीण-भावाला संशय आला. त्यांनी चौकशी केली असता आरोपींनी त्यांना फसवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर फोन किंवा ई-मेलला आरोपी प्रतिसाद देत नसल्यामुळे एलिशबाने अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. त्यांचा शोध घेतला जात आहे.