शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या ‘कॅम्पेनिंग’वर संघ असमाधानी

By admin | Updated: May 20, 2015 02:46 IST

भूसंपादन विधेयकाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाठिंबा दर्शविला असला तरी मोदी सरकारच्या कार्यप्रणालीवर संघ पूर्णपणे समाधानी नाही.

योगेश पांडे  नागपूरभूसंपादन विधेयकाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाठिंबा दर्शविला असला तरी मोदी सरकारच्या कार्यप्रणालीवर संघ पूर्णपणे समाधानी नाही. या विधेयकाचा ज्या पद्धतीने तळागाळात प्रचार व प्रसार करणे आवश्यक होते तो त्या पद्धतीने झाला नसल्याचे संघ पदाधिकाऱ्यांचे मत आहे. महत्त्वाचे म्हणजे या विधेयकातील मुद्दे व्यापक प्रमाणावर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून गैरसमज दूर करण्याचा सल्ला संघाकडूनच अखिल भारतीय प्रतिनिधी सभेदरम्यान देण्यात आला होता. शिवाय या विधेयकाबाबत कुठलेही ‘कॅम्पेनिंग’ करण्यात येणार नसल्याचे संघाने स्पष्ट केले आहे.भूसंपादन विधेयकावरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील काही संस्था विरोधात असल्याचे जगजाहीर आहे. या विधेयकाला संघप्रणित संघटनांचादेखील विरोध होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली. सरकार्यवाह भय्याजी जोशी व सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी संशोधनानंतर हे विधेयक शेतकरीविरोधी नसल्याचे जाहीर विधानदेखील केले होते. शिवाय भारतीय मजदूर संघ व भारतीय किसान संघ यांसारख्या संघटनांनी रस्त्यावर उतरण्याअगोदर आमचा सल्ला घ्यावा असेदेखील संघाकडून स्पष्ट करण्यात आले.परंतु मोदी सरकारच्या कार्यप्रणालीवर संघ पूर्णपणे समाधानी नाही. मार्च महिन्यात नागपूरमध्ये झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेदरम्यान या विधेयकातील मुद्दे शेतकरीविरोधी नाहीत हे जनतेपर्यंत नेण्यासाठी मोदी सरकारने ‘कॅम्पेन’ करावे, अशी सूचना संघाकडून देण्यात आली होती. नितीन गडकरी यांच्यासमवेत मोदी सरकारमधील काही मंत्र्यांनी पुढाकार घेऊन याबाबतीत देशभर दौरेदेखील केले. परंतु गडकरी व बोटावर मोजण्याइतके नेते वगळता प्रत्यक्ष तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत जाऊन इतरांना प्रभावी संवाद साधता आला नाही. काही नेत्यांच्या सभांना तर शेतकरी कमी अन् कार्यकर्तेच जास्त अशी स्थिती होती. ज्या ‘सोशल मीडिया’चा निवडणूकांमध्ये प्रचार केला, त्याचादेखील या विधेयकाच्या ‘कॅम्पेनिंग’साठी हवा तसा उपयोग करण्यात आलेला नाही. दुसरीकडे कॉंग्रेस व इतर विरोधी पक्षांकडून मात्र केंद्र शासनावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. या विधेयकावरून केंद्र व पर्यायाने संघ परिवाराच्या जनमानसातील प्रतिमेला धक्का बसतो आहे, असे संघाच्या काही पदाधिकाऱ्यांचे मत आहे. (प्रतिनिधी)ही संघाची नव्हे सरकारची जबाबदारीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केंद्र शासनाच्या कुठल्याही कारभारात हस्तक्षेप करण्यात येत नाही. भूसंपादन विधेयकाबाबत संघ परिवारातील संस्थांची विविध मते आहेत. या विधेयकातील तरतुदी या शेतकऱ्यांसाठी आहेत व त्या त्यांच्या विरोधात कशा नाहीत, हे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. यातील मुद्दे प्रभावी पद्धतीने सरकारने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला हवेत. या विधेयकाबाबत जनमानसात संघाकडून कुठलेही ‘कॅम्पेनिंग’ करण्यात येणार नाही. जर कुठल्या संघटनेला यात सहभागी व्हायचे असेल तर त्यांचा निर्णय घ्यायला ते स्वतंत्र आहेत.-डॉ.मनमोहन वैद्य, अखिल भारतीय प्रचारप्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ