शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
5
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
6
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
7
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
8
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
9
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
10
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
11
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
12
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
13
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
14
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
15
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
16
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
17
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
18
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
19
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
20
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे समायोजन दोषपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST

नागपूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील ५२ शिक्षकांचे समायोजन गुरुवारी करण्यात आले, परंतु हे समायोजन दोषपूर्ण असल्याच्या ...

नागपूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील ५२ शिक्षकांचे समायोजन गुरुवारी करण्यात आले, परंतु हे समायोजन दोषपूर्ण असल्याच्या तक्रारी शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केल्या आहे.

जिल्हा परिषदेच्या शहरातील काटोल रोडवरील जिल्हा परिषद हायस्कूल, पटवर्धन हायस्कूलमध्ये मान्य पदापेक्षा कार्यरत शिक्षकांची संख्या अधिक होती. पटवर्धन हायस्कूलमध्ये विद्यार्थी २ आणि शिक्षक ६ होते, तर काटोल रोडवरील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये ८ पदांची मान्यता असताना १७ शिक्षक कार्यरत होते. त्यामुळे जिल्हा परिषदेने माध्यमिक विभागाच्या १४ शिक्षकांची व प्राथमिक शाळेच्या अतिरिक्त ठरलेल्या ३८ शिक्षकांचे समायोजन केले. समायोजनात काही शिक्षकांना ज्या पदस्थापना मिळाल्या, त्यावर शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे.

एका शिक्षकांनी आरोप केला की, भाषा विषय संवर्गात एकूण ९ शिक्षक अतिरिक्त ठरविण्यात आले. समुपदेशनात प्राधान्यक्रमातील तीन शिक्षकांकरिता ३ जागा डिस्प्लेवर दाखविण्यात येऊन समायोजन करण्यात आले. त्यानंतर, सामाजिक शास्त्र संवर्गातील शिक्षकांचे समुपदेशन घेण्यात आली. त्यानंतर, पुन्हा भाषा संवर्गातील ९ पैकी ६ शिक्षकांना उर्वरित सर्व जागा सामाजिक शास्त्रासह रिक्त दर्शवून उपलब्ध करून देण्यात आल्या. प्राधान्य क्रमाव्यतिरिक्तही शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी पदस्थापना देण्यात आली. एका शिक्षकाचे म्हणणे आहे की, आदिवासी क्षेत्रात सेवा दिलेली असताना, समायोजनाच्या प्रक्रियेत पुन्हा त्याच तालुक्यात पदस्थापना देण्यात आली. पतिपत्नी एकत्रीकरणांतर्गत ३० किलोमीटरच्या आत पदस्थापना देण्याचे शासन धोरण आहे. समायोजनात याचा विचार केला नाही. एका शिक्षकाने आरोप केला की, शाळेच्या पटसंख्येनुसार अतिरिक्त ठरत नसतानाही अतिरिक्त केले. अशा काही तक्रारी शिक्षकांच्या आहेत. या संदर्भात त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत.