शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

टीडीएस कापला पण रिफंड नाही; पोस्टाच्या हिशेबात गडबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 10:58 IST

शासनाच्या अल्पबचत योजनांसाठी पोस्ट विभागाच्या माध्यामातून काम करणाऱ्या नागपुरातील काही अभिकर्त्यांचा हिशेब योग्यरीत्या जुळत नाही. त्यांचा टीडीएस कापण्यात आला, पण त्यांना रिफंड मिळालेला नाही.

ठळक मुद्देपोस्ट विभागातील अल्पबचत अभिकर्त्यांची समस्या

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोस्ट विभागात अल्पबचतीचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यांचा हिशेब आणि ऑडिट करण्याचे काम विभागाकरिता नवीन नाही. त्यानंतरही शासनाच्या अल्पबचत योजनांसाठी पोस्ट विभागाच्या माध्यामातून काम करणाऱ्या नागपुरातील काही अभिकर्त्यांचा हिशेब योग्यरीत्या जुळत नाही. त्यांचा टीडीएस कापण्यात आला, पण त्यांना रिफंड मिळालेला नाही. हिशेबात एक कोटी रुपयांची गडबड झाल्याचा त्यांचा दावा आहे.अभिकर्त्यांना आयटीआय कायद्यांतर्गत पोस्ट कार्यालयाकडून प्राप्त माहितीत खुलासा झाला आहे. वर्ष २००८ ते २०१३ च्या हिशेबात मोठ्या त्रुटी समोर आल्या आहेत. हा हिशेब ऑनलाईनमध्ये (२६एएस फॉर्म) मिळत नाही. गेल्या १० वर्षांत काही एजंट रिफंड मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अभिकर्ता चंद्रा चंदनानी यांना सिटी पोस्ट ऑफिस, इतवारी येथून आयटीआयअंतर्गत माहिती प्राप्त झाली आहे. वर्ष २००८-०९ मध्ये एजंटांचा ३७ लाख ७ हजार १२८ रुपये टीडीएस कापण्यात आला. पण सरकारी तिजोरीत ८ लाख ८ हजार ९२४ रुपये जमा करण्यात आले; तर २८ लाख ९८ हजार १५४ रुपये गेले कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचे स्टेटमेंट पॅन कार्ड नंबरसह जमा करण्यात आलेले नाही, असा आरोप काही एजंटांनी केला आहे. या हिशेबाचा ताळमेळ साधण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. याशिवाय अभिकर्ता अनिल चंदनानी यांनी २००९-११ च्या रेकॉर्डची आयटीआयमध्ये माहिती प्राप्त केली. त्यांच्यानुसार ४८ लाख २८ हजार १८५ रुपये टीडीएस कापण्यात आला आणि सरकारी तिजोरीत १८ लाख ८ हजार ३०१ रुपये जमा करण्यात आले, तर ३० लाख १९ हजार ८८४ रुपये गेले कुठे? चंदवानी यांना २०१०-११ च्या वर्षातील प्राप्त माहितीमध्ये ५१ लाख ४५ हजार ७३२ रुपये टीडीएस कापण्यात आला आणि सरकारी तिजोरीत ५१ लाख ९८ हजार ३१५ रुपये जमा करण्यात आले. या हिशेबात ५२ हजार ५८३ रुपये अतिरिक्त कुठून जमा करण्यात आले, हा प्रश्न आहे. यासंदर्भात पोस्ट विभागाचे पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

आतापर्यंत नाही मिळाली माहितीहिशेबात त्रुटी असल्याने ८ जुलै २०१९ ला आयटीआय कायद्यांतर्गत माहितीसाठी अर्ज केला आहे. पण अजूनही माहिती मिळालेली नाही. बेझनबाग पोस्ट ऑफिसमध्ये एजंट शोभा. के. बालानी यांना वर्ष २०१६-१९ पर्यंतचे टीडीएस सर्टिफिकेट मिळालेले नाही. राजकिरण मसंद यांच्या प्रकरणातही हीच बाब आहे. एक कोटीपेक्षा जास्तचा हिशेब जागरुक अभिकर्त्यांनी मागितलेल्या माहितीत पुढे आला आहे. असे किती एजंटांच्या बाबतीत घडले असेल, याची माहिती नाही. ऑडिटमध्ये बॅलेन्स शीट कशी जुळली, ही आश्चर्याची बाब आहे. एजंट अनिल चंदनानी यांचा रिफंड रिजेक्ट झाला आणि डिमांडही निघाली. अशा स्थितीत अभिकर्त्यांचा काम करण्यात रस नाही.के. एम. बालानी, अभिकर्ता.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस