शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यानेच वाढविली अपंगत्वाची टक्केवारी

By admin | Updated: July 3, 2014 00:53 IST

जिल्हा परिषदेत बोगस अपंग शिक्षकाचे प्रकरण बाहेर आल्यानंतर आता तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याने अपंगत्वाची टक्केवारी वाढविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माहिती अधिकाराने या

बिंग फुटले : मेडिकल बोर्डाला मागितला अहवाल सुरेंद्र राऊत - यवतमाळ जिल्हा परिषदेत बोगस अपंग शिक्षकाचे प्रकरण बाहेर आल्यानंतर आता तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याने अपंगत्वाची टक्केवारी वाढविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माहिती अधिकाराने या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे बिंग फुटले आहे. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत देवकते यांनी माहिती अधिकारांतर्गत हा प्रकार उघडकीस आणला. बाभुळगाव येथे तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत डॉ. मोहन खडतकर यांनी १६ जून २००४ मध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढले. वैद्यकीय बोर्डाने त्यांना ४५ टक्के अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र दिले. याची नोंद जिल्हा शल्यचित्किसक कार्यालयातील रजिस्टरमध्ये आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्हा परिषद आरोग्य विभागात सादर केलेल्या अपंग प्रमाणपत्रात अपंगत्वाची टक्केवारी ५१ इतकी करण्यात आली आहे. अपंग प्रमाणपत्रामध्ये टक्केवारीच्या ठिकाणी खोडतोड करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. डॉ. मोहन खडतकर यांचे अपंगत्व ४५ की ५१ टक्के यासाठी वैद्यकीय मंडळाने पुर्नतपासणी करून त्याचा अहवाल पाठवावा, अशी सूचना दिली आहे.अपंगत्वाची टक्केवारी वाढवून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याने शासनाच्या अनेक सवलतींचा लाभ घेतला आहे. वेतनातील मासिक लाभ, व्यवसाय रोध भत्ता, आयकर करातील सवलत तसेच शासनाच्या इतर आर्थिक सवलतींचा लाभ घेतला आहे. याची चौकशी करून दिशाभूल करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.