शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

बोलणी फिस्कटली, मोर्चा अडला

By admin | Updated: December 16, 2015 03:26 IST

शासनकर्त्यांनी लेखी आश्वासन देऊनही संगणक परिचालकांच्या मागण्या वर्षोनुवर्ष प्रलंबित राहिल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक ...

संगणक परिचालक : टेकडी रोडवर ठिय्या, तिघांना घेतले ताब्यातनागपूर : शासनकर्त्यांनी लेखी आश्वासन देऊनही संगणक परिचालकांच्या मागण्या वर्षोनुवर्ष प्रलंबित राहिल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या २० हजार संगणक परिचालकांनी विधानभवनावर विराट मोर्चा काढला. टेकडी मार्गावरील त्यांच्या मोर्चाला दिवसभर एकाही मंत्र्याने भेट न दिल्यामुळे मोर्चेकरी चांगलेच संतप्त झाले. यात काही जणांनी गोंधळ घालण्याचा आणि संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरा मंत्र्यांसोबत वाटाघाटी फिस्कटल्यामुळे मोर्चेकऱ्यांनी मोर्चा मुक्कामी ठेवण्याचा निर्णय घेतला.संग्राम प्रकल्पातील संगणक परिचालकांना पदनिश्चित करून शासनसेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्यावतीने अनेकदा शासनदरबारी पाठपुरावा केला. प्रत्येक वेळी संघटनेला लेखी आश्वासन देण्यात आले. त्यामुळे १५ डिसेंबरला संगणक परिचालकांनी विधानभवनावर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. २० हजारावर संगणक परिचालकांचा विराट मोर्चा विधानभवनावर धडकला. पोलिसांनी टेकडी मार्गावर मोर्चा अडवून धरला. संगणक परिचालकांच्या संग्राम प्रकल्पाची मुदत ३१ डिसेंबर २०१५ रोजी संपणार आहे. त्याबाबत महाआॅनलाईन कंपनीने सर्व संगणक परिचालकांना अंतिम नोटीस देऊन ३१ डिसेंबर २०१५ पासून महाआॅनलाईन कंपनीशी त्यांचा काहीच संबंध नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे संघटनेने विधानभवनावर भव्य मोर्चाचे आयोजन केले. दिवसभर उन्हात मोर्चेकऱ्यांनी ठाण मांडून शासनविरोधी घोषणाबाजी केली. परंतु दिवसभर एकाही मंत्र्याने मोर्चाला भेट दिली नाही. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास मोर्चेकरी संतप्त झाले होते. सायंकाळी ७ वाजता मोर्चातील शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. परंतु संघटनेसोबत त्यांची बोलणी फिस्कटली. त्यामुळे ३४ जिल्ह्यातील संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी बैठक घेऊन मोर्चा कायम ठेवण्याचा निर्धार केला.