शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक ऑफलाईन सभेत घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:08 IST

धर्मपाल मेश्राम यांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची नियोजित ऑफलाईन ...

धर्मपाल मेश्राम यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची नियोजित ऑफलाईन निवडणूक रद्द करून ती ऑनलाईन घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. महासभेत शहरातील अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा होणे अपेक्षित होते. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी ५ जानेवारी २०२१ रोजी होणारी महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक आणि सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीनेच घ्या, अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.

महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीकरिता सर्वसाधारण सभा ऑफलाईन पद्धतीने न घेता ऑनलाईन घेणे व सर्वसाधारण सभा घ्यायचे टाळणे हे प्रशासन व राज्य सरकारचे संगनमत आहे. सूडाचे राजकारण जनतेपुढे येऊ नये यासाठी राज्य सरकार ऑनलाईन सभांचा पायंडा पाडण्याचे कारस्थान करीत आहे. एकिकडे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पत्रान्वये जिल्हा नियोजन समितीची सभा ११ जानेवारी २०२१ ला डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. मात्र भाजपची सत्ता असलेल्या नागपूर मनपाची सभा प्रत्यक्षरीत्या घेण्यापासून थांबविण्याचे कारस्थान महाविकास आघाडी सरकार करत आहे, असा आरोपही ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.

मनपाच्या ऑनलाईन सभेमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा टाळली जाईल. राज्य शासनाकडून मनपाला दरवर्षी मिळणाऱ्या निधीला यावर्षी कात्री लावली आहे. कार्यादेश झालेली विकास कामे थांबवली आहेत. सरकार लोकप्रतिनिधींच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळत आहे. वास्तविक कोविड संदर्भातील सर्व दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करून सभा घेता आली असती असा आरोप त्यांनी केला आहे.