शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

५०० रुपये घ्या अन् व्यवसाय करा !

By admin | Updated: February 12, 2015 02:11 IST

आजच्या काळात ५०० रुपयात पिशवीभर भाजीपालासुद्धा येत नाही. परंतु शासन मात्र ५०० रुपयात स्वत:चा व्यवसाय करता येऊ शकतो, यावर आजही ठाम आहे. होय, ...

लोकमत विशेषआनंद डेकाटे नागपूर आजच्या काळात ५०० रुपयात पिशवीभर भाजीपालासुद्धा येत नाही. परंतु शासन मात्र ५०० रुपयात स्वत:चा व्यवसाय करता येऊ शकतो, यावर आजही ठाम आहे. होय, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगार योजनेखाली महिलांना स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी अनुदान दिले जाते ३० वर्षांपूर्वी मिळणारे ५०० रुपयाचे अनुदान आजही तितकेच असून, त्यात एक रुपयाचीही वाढ झाली नाही. परिणामी या योजनेसाठी अर्ज करणेच बंद झाले असून योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांच्या विकासासाठी राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे विविध योजना राबविलेल्या जातात. यात सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे स्वयंरोजगाराची योजना होय. या योजनेंतर्गत महिलांना व्यक्तिगत अनुदान दिले जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना खाद्यपदार्थ तयार करून विकणे, मण्यांच्या वस्तू विकणे, भाजीपाला व फळे विकणे आदी व्यवसाय करण्यासाठी मदत म्हणून शासनातर्फे ५०० रुपये अनुदान दिले जाते. अनुदान वाढीची मागणी शासन दरबारी पडून महिलांच्या स्वयंरोजगारासाठी देण्यात येणारे ५०० रुपयांचे अनुदान हे १९८५ च्या निकषानुसार आहेत. ३० वर्षांचा काळ लोटला आहे. त्यामुळे आज ५०० रुपयात व्यवसाय करणे शक्य नाही. त्यामुळे यासंदर्भातील निकष बदलून अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी विनंती करणारी शिफारस महिला व बाल विकास विभागातर्फे राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. परंतु शासनाने यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाही.