शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
3
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
4
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
5
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
6
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
7
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
8
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
9
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
10
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
11
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
12
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
13
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
14
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
15
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
16
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
17
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
18
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
19
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय निष्काळजीमुळे सुयशच्या मंडलिक दाम्पत्याला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:21 IST

नागपूर : वैद्यकीय निष्काळजीपणा केल्यामुळे अभ्यंकरनगर येथील सुयश नर्सिंग होमच्या मुख्य व्यवस्थापक डॉ. रागिणी मंडलिक व त्यांचे पती डॉ. ...

नागपूर : वैद्यकीय निष्काळजीपणा केल्यामुळे अभ्यंकरनगर येथील सुयश नर्सिंग होमच्या मुख्य व्यवस्थापक डॉ. रागिणी मंडलिक व त्यांचे पती डॉ. मिलिंद मंडलिक यांनी तक्रारकर्ते दाम्पत्य उमेश व शीतल पानबुडे यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १२ लाख व तक्रार खर्चापोटी ३० हजार रुपये भरपाई अदा करावी असे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले. मंडलिक दाम्पत्याला या आदेशांचे पालन करण्यासाठी एक महिन्याचा वेळ देण्यात आला. तसेच, या मुदतीत आदेशाचे पालन करण्यात अपयश आल्यास रोज ३०० रुपये अतिरिक्त भरपाई लागू होईल असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी हा निर्णय दिला. तक्रारकर्त्या शीतल पानबुडे यांनी बाळंतपणाचे उपचार मंडलिक दाम्पत्याकडे केले. वेळोवेळी आवश्यक तपासण्या केल्या गेल्यानंतर १४ जानेवारी २०११ रोजी शीतल यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. १८ जानेवारी रोजी त्यांना सुटी देण्यात आली. प्रसूतीपूर्वी तक्रारकर्त्यांना बाळ सामान्‍य असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात बाळाला विविध शारीरिक व्याधी होत्या. त्याची माहिती आधीच दिली गेली असती तर, बाळाला जन्‍म द्यायचा किंवा नाही याचा योग्‍यवेळी निर्णय घेता आला असता. आता जन्मलेल्या बाळाला आयुष्‍यभर व्‍याधी सोसाव्‍या लागतील. त्याचा त्याला मानसिक व शारीरिक त्रास होईल. त्यामुळे कुटुंबीयांनाही यातना होतील असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे होते. तक्रारकर्त्यांनी यासंदर्भात मंडलिक दाम्पत्याला पत्र लिहून आवश्यक भरपाई देण्याची मागणी केली होती. परंतु, मंडलिक दाम्पत्याने स्वत:ची चूक अमान्य करून भरपाई देण्यास नकार दिला. परिणामी, तक्रारकर्त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली. आयोगाने तक्रारीवरील अंतिम सुनावणीनंतर मंडलिक दाम्पत्याचे उत्तर व रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता हा निर्णय दिला. मंडलिक दाम्पत्याने वैद्यकीय सेवेमध्ये निष्काळजीपणा केला असे आयोगाने जाहीर केले.