कामठीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:09 IST2021-03-23T04:09:17+5:302021-03-23T04:09:17+5:30

कामठी : शहरातील हरदासनगर परिसरातील व्यायाम शाळेसमाेर एका तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. ही घटना साेमवारी सकाळी १०.३० ...

Suspicious death of a young man in Kamathi | कामठीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू

कामठीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू

कामठी : शहरातील हरदासनगर परिसरातील व्यायाम शाळेसमाेर एका तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. ही घटना साेमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, जुनी कामठी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

विवेक रमेश हुमणे (३७, रा. संताेषीमाता मंदिराजवळ, हमालपुरा, कामठी) असे मृत तरुणाचे नाव आहे. हरदासनगर व्यायाम शाळेसमाेर तरुणाचा मृतदेह पडून असल्याची माहिती मिळताच ठाणेदार विजय मालचे यांनी घटनास्थळ गाठून तपासणी केली. दरम्यान, मृताची आई हिरावती हुमणे व भाऊ घटनास्थळी आल्यानंतर मृताची ओळख पटली. पाेलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. मृत विवेक हा रात्री ३ वाजताच्या सुमारास घरून निघून गेला हाेता, असे त्याच्या आईने पाेलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ताे दारूच्या आहारी गेला हाेता. अतिदारू सेवनाने पडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी शहरात तरुणाचा खून झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळी नागरिकांनी माेठी गर्दी केली हाेती. घटनेची माहिती मिळताच पाेलीस उपायुक्त नीलाेत्पल, सहायक पाेलीस उपायुक्त मंगेश पंडित यांनी घटनास्थळी पाहणी केली. मृताच्या आईच्या तक्रारीवरून जुनी कामठी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण कळेल व त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे ठाणेदार विजय मालचे यांनी सांगितले.

Web Title: Suspicious death of a young man in Kamathi