शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

आरएफओ, फॉरेस्टर निलंबित

By admin | Updated: July 2, 2014 00:53 IST

पवनी वनपरिक्षेत्रातील पुसदा जंगलातील लाखो रुपयांच्या सागाच्या अवैध कटाईप्रकरणी वन परिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) व वनपालासह (फॉरेस्टर) तिघांविरुद्ध निलंबन कारवाई करण्यात आली आहे.

पवनी येथील अवैध वृक्षतोड : वन विभाग इतर आरोपींच्या शोधातनागपूर : पवनी वनपरिक्षेत्रातील पुसदा जंगलातील लाखो रुपयांच्या सागाच्या अवैध कटाईप्रकरणी वन परिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) व वनपालासह (फॉरेस्टर) तिघांविरुद्ध निलंबन कारवाई करण्यात आली आहे. यात पवनी येथील वन परिक्षेत्र अधिकारी मदनलाल जायस्वाल, वनपाल एस. आर. लांजेवार व बीटरक्षक टी. एस. मोहम्मद यांचा समावेश आहे. माहिती सूत्रानुसार सोमवारी चौकशी अधिकारी तथा विभागीय वन अधिकारी (दक्षता) प्रदीप मसराम यांनी या संपूर्ण प्रकरणाचा प्राथमिक रिपोर्ट तयार करून तो मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) शैलेष टेंभूर्णीकर यांच्याकडे सादर केला. त्यावर टेंभूर्णीकर यांनी लगेच आरएफओ व फॉरेस्टरच्या निलंबनाचे आदेश जारी केले. शिवाय वनरक्षकाला निलंबित करण्याचा अधिकार हा उपवनसंरक्षक यांना असल्यामुळे मसराम यांनी चौकशी अहवालाची दुसरी प्रत पी. के. महाजन यांच्याकडे सादर केली. त्याआधारे महाजन यांनी सायंकाळी उशिरा बीट वनरक्षक टी. एस. मोहम्मद यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला. प्रेमलाल तसमेर नावाच्या एका खाजगी ठेकेदाराने गत १५ दिवसांपूर्वी पुसदा येथील संरक्षित जंगलातील लाखो रुपयांच्या सागाच्या झाडांची अवैध कटाई केली आहे. मात्र असे असताना संबंधित आरएफओ, फॉरेस्टर व वनरक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु गत २६ जून रोजी आरोपी ठेकेदार हा त्या लाकडाची वाहतूक करताना वन विभागाच्या जाळ्यात अडकला. यानंतर त्याला लगेच अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र संबंधित वन अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे तो लगेच जामिनावर बाहेर आला. संबंधित वन अधिकाऱ्यांनी न्यायालयासमक्ष जाणिवपूर्वक वन विभागाची ठोस बाजू मांडली नसल्याचा आरोप आहे. त्याचा ठेकेदाराला जामीन मिळण्यास फायदा झाला. दुसरीकडे वन विभागाचे एक पथक या गोरखधंद्यातील इतर आरोपींचा शोध घेत आहे. (प्रतिनिधी)