शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी, मग शाळांचे स्थलांतर नाही; महाराष्ट्र सरकारचे नवे धोरण, अटी व अंतरमर्यादा लागू 
2
"नकाशावर टिकून राहायचंय की इतिहासात गाडले जायचंय..."; भारतीय लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला थेट इशारा
3
घर खरेदी करण्यापूर्वी पाहा 'हे' ५ गोल्डन रुल्स, अन्यथा वाढू शकतो कर्जाचा बोजा
4
धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल
5
Swapna Barman : "मी राजकारणात येऊन चूक केली", TMC उमेदवाराच्या घराला आग, काय म्हणाल्या स्वप्ना बर्मन?
6
Ganga Dussehra 2026: १७ मे रोजी अधिक मास आणि गंगा दशहरा उत्सवास प्रारंभ; रामसेतू बांधणीचाही मुहूर्त हाच!
7
मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय?
8
अधिक मास २०२६: पुरुषसूक्त की विष्णुसहस्रनाम? अधिक मासात कोणते स्तोत्र ऐकणे ठरेल अधिक लाभदायी?
9
उडत्या विमानाचा फोटो काढणे पडले भयंकर महागात! दुबईत भारतीय तरुणाला थेट १० वर्षांचा तुरुंगवास
10
India and UAE: एमिरेट्स NBD ची झाली RBL बँक; ३ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक डीलला सरकारची मंजुरी
11
हबिबा फसवणूक प्रकरण : आधी प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवली, नंतर जाळ्यात ओढले, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये फुटले महेशचे बिंग
12
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
13
Mamata Banerjee : "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या
14
दिवाळीच्या तोंडावर नोकरीवरून हाकलले; ६ महिन्यांनी त्याच कंपनीने डेटासाठी फोन केला अन्.. 
15
'डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये..."; विद्यार्थिनीकडे संतापजनक मागणी, लखनौ विद्यापीठात खळबळ
16
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
17
‘आनंद’ मरा नहीं, आनंद कभी नहीं मरते...!
18
सिडकोकडील स्थानके मध्य रेल्वेकडे देणार, नवी मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर
19
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
20
काम पूर्ण होण्याआधीच मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खड्डे, सेवारस्ते आणि पुलांची कामे रखडलेलीच
Daily Top 2Weekly Top 5

घराण्यांच्या संमिश्रतेने रंगलेली सुरेल मैफिल

By admin | Updated: June 16, 2014 01:11 IST

पं. उल्हास कशाळकर म्हणजे सौंदर्यपूर्ण गायकीचे उत्तम उदाहरण. मूळ वैदर्भीय गायक असल्याने स्वाभाविकपणे येथल्या रसिकांचे त्यांच्यावर विशेष प्रेम आहे. त्यांच्या दमदार गायकीचा अनुभव

अनुभूती सांस्कृतिक महोत्सव : पं. उल्हास कशाळकर यांचे गायन
नागपूर : पं. उल्हास कशाळकर म्हणजे सौंदर्यपूर्ण गायकीचे उत्तम उदाहरण. मूळ वैदर्भीय गायक असल्याने स्वाभाविकपणे येथल्या रसिकांचे त्यांच्यावर विशेष प्रेम आहे. त्यांच्या दमदार गायकीचा अनुभव रसिकांना आनंद देणारा आहे. पं. उल्हास कशाळकर यांचे गायन ऐकण्यासाठी श्रोते नेहमीच तयार असतात, याचा प्रत्यय आज अनुभूतीच्या सांस्कृतिक महोत्सवात आला. पं. कशाळकर यांच्या कसदार गायनाने ही मैफिल रंगली. गायकीच्या विविध घराण्यांची संमिश्रता त्यांचे गायन अधिक गहिरे करणारी आणि मैफिलीत सौंदर्य ओतणारी होती.
हा कार्यक्रम चिटणवीस सेंटर येथे पार पडला. पं. कशाळकर हिंदुस्थानी शास्त्रीय गायक म्हणून परिचित आहेत. ग्लाव्हेर, आग्रा, जयपूर घराण्याच्या गायकीचे वैविध्य त्यांच्या गायनात रसिकांना आनंद देणारे आहे. नागपूर जिल्ह्यातील पांढरकवडा येथे त्यांचा जन्म झाला. त्यामुळे ते नागपूरकर रसिकांना अधिक जवळचे वाटतात. त्यांचे प्रारंभिक संगीताचे शिक्षण त्यांचे वडील नागेश कशाळकर यांच्याकडे झाले. या दरम्यान त्यांना राजाभाऊ कोगजे, प्रभाकरराव खर्डेनवीस यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यानंतर राम मराठे यांच्याकडे आग्रा घराण्याचे आणि गजाननबुवा जोशी यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याची गायकी त्यांनी आत्मसात केली. पं. उल्हासजींच्या गायनात जयपूरच्या गायकीचे निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रय विष्णु पलुस्कर, मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व यांचा प्रभाव आहे. हे सारेच रसिकांसाठी विलक्षण सुरेलतेचा अनुभव देणारे आहे. पंडितजींनी आपल्या गायनाचा प्रारंभ राग रामकलीने केला. रामकली रागात त्यांनी विलंबित मोठा ख्याल आणि द्रुत लयीत छोटा ख्याल सादर केला. त्यानंतर सर्वांगसुंदर हिंडोल बहार रागाला त्यांनी प्रारंभ केला. रागाचे सौंदर्य हळुवार उलगडत त्यांनी वैविध्यपूर्णतेने रागाची मांडणी करताना दोन बंदीशी सादर केल्या. यानंतर ‘जोहार माय बाप जोहार...’ हे नाट्यपद सादर करुन त्यांनी रसिकांची दाद घेतली. ही मैफिल पंडितजींच्या नावाचीच होती. ती संपूच नये असे वाटत असताना पंडितजींनी भैरवीला प्रारंभ केला.
गोडी अपूर्णतेची ठेवत ही मैफिल संपली. त्यांना संवादिनीवर सुधीर नायक यांनी साथसंगत केली. तबल्यावर पं. सुरेश तळवलकर यांनी संगत केली.
याप्रसंगी पं. तळवलकर यांनी स्वरांची, संगीताची आध्यात्मिक अनुभूतीचा आलेला प्रत्यय सांगितला. पं. कशाळकरांना परिमल कोल्हटकर, श्रेयस तांबे यांनी गायनात साथ केली. या मैफिलीनेच अनुभूती महोत्सवाची सांगता झाली. (प्रतिनिधी)