शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आईची दोन मुलांसह आत्महत्या

By admin | Updated: May 18, 2015 02:29 IST

कौटुंबिक कलहातून आईने दोन मुलांना सोबत घेऊन विहिरीत उडी घेतली. यात तिघांचाही मृत्यू झाला.

विहिरीत घेतली उडी : हिवराबाजार येथील घटनादेवलापार : कौटुंबिक कलहातून आईने दोन मुलांना सोबत घेऊन विहिरीत उडी घेतली. यात तिघांचाही मृत्यू झाला. ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवराबाजार येथे रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्रीती कवडू वासनिक (२५, रा. हिवराबाजार, ता. रामटेक) असे मृत आईचे तर शंतनू (७) आणि सिद्धांत (४) अशी मृत मुलांची नावे आहेत. कवडू वासनिक (४५) याला पहिल्या पत्नीपासून अपत्य नसल्याने त्याने तिच्या संमतीने २०१० मध्ये प्रीतीशी विवाह केला. प्रीतीचाही हा दुसरा विवाह होता. तिला पहिल्या घरचा शंतनू हा मुलगा असून, शाळेत त्याचे नाव शंतनू कवडू वासनिक असे आहे. त्यानंतर सिद्धांतचा जन्म झाला. दरम्यान, या दोघींमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. कवडूच्या पहिल्या पत्नीला रविवारी सकाळी भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे जावयाचे होते. त्यामुळे कवडूने तिच्यासाठी चहा तयार केला होता. ती घरून निघून गेल्यानंतर कवडू व प्रीतीमध्ये याच कारणावरून भांडण झाले. कवडूने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कवडूने त्याच्या पहिल्या पत्नीशी बोलू नये, असा हट्ट धरला होता. तो किराणा दुकानातील साहित्य खरेदी करण्यासाठी दुपारी घराबाहेर पडला. तो मध्यंतरी घरी परल्यानंतर शंतनू व सिद्धांत दोघेही घराबाहेर खेळत होते. प्रीती डॉक्टरकडे गेल्याचे मुलांनी त्याला सांगितले. त्यानंतर तो दुपारी ३ वाजताच्या सुमारास पुन्हा घरी आला. त्यावेळी मुले घरी नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने चौकशी केली असता, कुणाला काहीही माहिती नव्हते. दरम्यान, हिवराबाजार - फुलझरी रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रांत बागडे यांच्या शेतातील विहिरीजवळ दोन्ही मुलांच्या चपला आढळून आल्या. संशय आल्याने बागडे यांनी विहिरीत डोकवले असता, सिद्धांतचा मृतदेह तरंगताना आढळून आला. काही वेळातच प्रीतीने दोन माुलांसह विहिरीत उडी घेतल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)