शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मिठाईलाही पैसे नसल्याने वाटली साखर

By admin | Updated: June 10, 2015 02:57 IST

घवघवीत यश मिळाले की आनंद होतो अन् मग तो आनंद व्यक्त करण्यासाठी लोक मिठाई वाटतात.

तरन्नुमची हतबलता : पण, कठोर परिश्रमाने दहावीत मिळवले ९३ टक्के वीरेंद्रकुमार जोगी नागपूरघवघवीत यश मिळाले की आनंद होतो अन् मग तो आनंद व्यक्त करण्यासाठी लोक मिठाई वाटतात. मिठाई जणू आनंदाचा पर्यायच झाली आहे. परंतु हाय रे प्रारब्ध... कठोर परिश्रमाच्या बळावर यशाची तार छेडणाऱ्या ‘तरन्नुम’कडे साधी मिठाई घ्यायलाही पैसे नव्हते. दहावीत ९३ टक्के गुण मिळाल्याची वार्ता तिच्या वस्तीत पोहोचली अन् जो-तो तिला मिठाई मागायला लागला. दोनवेळच्या अन्नाची भ्रांत तिथे मिठाई कुठून आणणार? अखेर तिने घरातल्या एक मळकट डब्यातून दोेन चमचे साखर काढली अन् शुभेच्छा द्यायला आलेल्यांच्या हातावर ठेवली. ही कहाणी आहे जगदीशनगरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या तरन्नुम सलीम अन्सारीची. शिक्षकांनीच केला शिक्षणाचा खर्चनागपूर :काटोल रोड फ्रे न्डस् कॉलनी येथील पंडित नेहरू हायस्कूलच्या तरन्नुम सलीम अन्सारी हिने दहावीत ९३ टक्के गुण मिळविले आहे. वडील मिळेल ती मजुरी करणारे तर आई घरोघरी धुणीभांडी करून हातभार लावणारी, घर म्हणजे जगदीशनगर झोपडपट्टीतील एक भाड्याची खोली. घरात व घराबाहेर स्वत:च्या अस्तित्वाचा नेहमीचा संघर्ष, घरात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कोणतेही काम करण्याची तयारी. तिने हिंमत हरली नाही अन् यशाला खेचून आणले आपल्या दारात. तरन्नुमचे वडील मेकॅनिक असले तरी स्वत:चे गॅरेज नाही. घरातील सर्व सदस्यांची भूक भागविण्यासाठी आईलाही कष्ट उपसावे लागतात. तरन्नुमही सुटीच्या दिवशी लग्न व इतर प्रसंगात हातावर मेहंदी काढून देत स्वत:चा खर्च भागविते. लहानपणापासूनच आपल्या बुद्धीची चमक दाखविणाऱ्या तरन्नुमला शिक्षकांची मदत मिळत राहिली. आठव्या वर्गात असताना नाव काढायला आलेल्या तिच्या पालकांचे मन शिक्षकांनी वळविले. आठव्या वर्गापासून तिच्या शिक्षणाचा खर्च शाळेतील शिक्षक करीत आहेत. पंडित नेहरू शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश भोयर, बाळा आगलावे व उल्हास पुरकाम यांचे मार्गदर्शन व मदत तिला मिळाली, राजेश दानव यांनी कोणत्याही अपेक्षेविना तिच्या उजळणीची जबाबदारी घेत तिचा अभ्यास करून घेतला. तिच्या या यशात शिक्षकांचा वाटा मोठा असल्याचे ती सांगते. (प्रतिनिधी)आता ध्यास एनडीएचा...एका खोलीचे घर असल्याने अभ्यास करताना मोठी अडचण होते. त्यामुळे अभ्यास करायचा असेल तर मैत्रिणींचे घर गाठावे लागत होते. कधी कधी घरात राहणेदेखील कठीण होत असे, अशी परिस्थिती असायची, तीन बहीण-भावात सर्वात मोठी असलेली तरन्नुम आपल्या भावंडांचादेखील अभ्यास घेते. ही पहिलीच पायरी आहे. आता एनडीए पास करून देशसेवा करीत आपल्या कुटुंबाला स्थैर्य मिळवून द्यायचे आहे, असेही तिने सांगितले.