शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत पाऊस मुक्कामी

By admin | Updated: August 5, 2015 02:54 IST

मागील महिनाभरापासून रुसून बसलेल्या पावसाने काल रात्रीपासून दमदार एन्ट्री केली आहे. विशेष म्हणजे, या पावसाने उपराजधानीतही मुक्काम ठोकला आहे.

‘नॉनस्टॉप’ बरसला : नागपुरात ३४.२ मिमी नागपूर : मागील महिनाभरापासून रुसून बसलेल्या पावसाने काल रात्रीपासून दमदार एन्ट्री केली आहे. विशेष म्हणजे, या पावसाने उपराजधानीतही मुक्काम ठोकला आहे. सोमवारी उपराजधानीत हलका पाऊस पडला. परंतु रात्री उशिरापासून त्याने चांगलाच जोर पकडला. यानंतर तो मंगळवारी दिवसभर ‘नॉनस्टॉप’ बरसला. त्यानुसार सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत नागपुरात ३४.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. हवामान खात्याच्या मते, बंगालच्या उपसागरातील आद्रतेमुळे ओडिशा, झारखंड व छत्तीसगड राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यातून पुढील २४ तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मंगळवारी नागपूरसह संपूर्ण विदर्भात जोरदार पाऊस झाला. विशेष म्हणजे, या पावसाचा शेतकऱ्यांना सर्वांधिक फायदा झाला. विदर्भातील शेतकऱ्याचा मागील काही दिवसांपासून जीव टांगणीला लागला होता. शेतातील पिके पावसाअभावी माना खाली टाकू लागले होते. परंतु या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील पुन्हा हसू परतले. आॅगस्ट हा सर्वांधिक पावसाचा महिना समजल्या जातो. त्यानुसार या महिन्याची सुरुवात दमदार पावसाने झाली आहे. (प्रतिनिधी)वस्त्यामध्ये पाणी शिरले दिवसभर नॉनस्टॉप बरसलेल्या पावसात दुपारी उच्च न्यायालयाशेजारी एक झाड कारवर कोसळल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय अंबाझरी मार्गावरील माटे चौकाशेजारी एका झाडाची फांदी तुटून रस्त्यावर पडली होती. कळमना परिसरातील रामानुजनगर, लक्ष्मीनगर व सूर्यनगर भागात पाणी भरले होते. उत्तर नागपुरातील कामगार नगर, रमाईनगर, तक्षशीलानगर, नालंदानगर व संघर्षनगर परिसरातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याची घटना पुढे आली आहे. सोबतच मानकापूर, गोधनी, पिवळीनदी, कामठी रोड, यादवनगर व इंदिरामाता नगर परिसरातील नागरिकांनासुद्धा अनेक समस्यांचा सामना करावा लागला. गोधनी परिसरातील अन्नबाबा नगर जलमय झाले होते. मानकापूर रिंग रोडशेजारच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी भरले होते.