शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

गोवारी समाजाचे विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:07 IST

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने १८ डिसेंबर २०२० रोजी गोवारींच्या बाबतीत दिलेल्या निर्णयामुळे समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित झाले आहेत. ...

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने १८ डिसेंबर २०२० रोजी गोवारींच्या बाबतीत दिलेल्या निर्णयामुळे समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित झाले आहेत. परंतु प्रोटेक्शन मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून अनु. जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती वैधतेचे प्रमाणपत्र परत मागत आहे. समितीच्या कारभारावर आदिवासी गोवारी समाज संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.

गोवारी समाजाच्या बहुतांश विद्यार्थ्यांकडे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र आहे. त्याच आधारे त्यांनी उच्च शिक्षणासाठी अर्ज केले होते. त्यांचे महाविद्यालयांमध्ये नंबरही लागले होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर त्यांना आता खुल्या वर्गातून उच्च शिक्षणाच्या स्पर्धेत उतरावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात १४ ऑगस्ट २०१८ ते सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या तारखेपर्यंत गोवारी समाजाच्या विद्यार्थ्यांनी अनु. जमातीच्या ‘गोंडगोवारी’ जात प्रमाणपत्रावर उच्च शिक्षणात प्रवेश घेतला. त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला संरक्षण दिले आहे. तसेच जे कर्मचारी नोकरीत लागले त्यांनाही संरक्षण दिले आहे. परंतु अनु. जमातीच्या प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सहआयुक्तांकडून त्यांचे वैधता प्रमाणपत्र परत मागविले जात आहे. समितीच्या सहआयुक्त गोवारी समाजाला वेठीस धरण्याचे काम करीत असल्याचा आरोप आदिवासी गोवारी समाज संघटनेने केला आहे.

- सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश ते सर्वोच्च न्यायालयाचा आदेश या दरम्यान शैक्षणिक व नोकरीविषयक संरक्षण दिले आहे. तसेच आदिवासी गोवारी समाजाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली असल्याने समितीने समितीने वैधता प्रमाणपत्र परत मागणे, जातीचे प्रकरण अवैध करणे थांबविले पाहिजे. अन्यथा गोवारी समाज त्यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल करेल.

कैलास राऊत, अध्यक्ष, आदिवासी गोवारी समाज संघटना