शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याचे अपहरण करून मारहाण

By admin | Updated: November 15, 2015 02:07 IST

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला डांबून ठेवत काही गुंडांनी बेदम मारहाण केली.

गंभीर जखमी, सोनसाखळी हिसकावली : तक्रार देऊनही गुन्हा दाखल नाहीनागपूर : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला डांबून ठेवत काही गुंडांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर देवनगर चौकातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंदार इंगळे (वय १९) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्याच्या वडिलांनी या प्रकरणाची तातडीने माहिती देऊनही प्रतापनगर पोलिसांनी रात्री ९.३० पर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता.छत्रपती चौकाजवळ राहणारा मंदार रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा द्वितीय वर्षांचा विद्यार्थी आहे. लक्ष्मीनगर पाण्याच्या टाकीजवळ कुख्यात डकाह टोळी राहते. या टोळीतील एका सदस्यासोबत मंदारचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. या पार्श्वभूमीवर, शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास मंदार माटे चौकाजवळ उभा असताना आरोपी करण डकाह आणि त्याच्या साथीदारांनी त्याला सिनेस्टाईल घेराव घातला. त्याला लक्ष्मीनगरातील पाण्याच्या टाकीजवळ नेले. तेथे एका रूममध्ये बंद करून मंदारला आरोपींनी बेदम मारहाण केली. त्याच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतली. रॉडचे फटके पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या मंदारला आरोपींनी सोडून दिल्यानंतर त्याने आपल्या नातेवाईकांना फोन केला. त्यानंतर त्याचे मित्र आणि नातेवाईक घटनास्थळाजवळ पोहचले. मंदारच्या वडिलांनी माहिती देऊन मदतीची विनंती केल्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव आपल्या सहकाऱ्यांसह लक्ष्मीनगरात पोहचले. त्यांनी गंभीर जखमी असलेल्या मंदारला देवनगरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रतापनगर पोलिसांनाही या गंभीर प्रकाराची माहिती दिली. (प्रतिनिधी)