शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तूल, एमडीसह विद्यार्थ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:08 IST

एनडीपीएस सेलच्या दोन कारवाया : ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त नागपूर : गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने कॉलेजच्या विद्यार्थ्यासह दोन युवकांना ...

एनडीपीएस सेलच्या दोन कारवाया : ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने कॉलेजच्या विद्यार्थ्यासह दोन युवकांना एमडी तस्करीत अटक केली आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्याकडून पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. दोन्ही कारवाईत ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

टेकडी लाइन सीताबर्डी येथील निखिल संतोष सावडिया (२१) बारावीचा विद्यार्थी आहे. त्याची आरोपी मृणाल गजभियेशी मैत्री आहे. मृणाल सीताबर्डीत फुटपाथवर कपडे विकतो. तो एमडीच्या तस्करीत आधीही पकडला गेला आहे. मृणालने निखिलला एमडी आणि पिस्तूल दिले होते. त्याची माहिती एनडीपीएस सेलला मिळाली. त्यांनी निखिलला अटक करून १.४७ लाखांची एमडी, पिस्तूल, काडतूस आणि दुचाकीसह २.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. निखिलच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वीच अपघातात मृत्यू झाला आहे. त्याचा परिवार पगडी बांधण्याचे काम करतो. दुसऱ्या घटनेत एनडीपीएस सेलने शेख साहिल शेख मेहमूद (२१) रा. रजा टाउन कपिलनगरला अ‍ॅक्टिव्हा गाडीवर जाताना पकडले. त्याची झडती घेतली असता, १७ हजारांची एमडी जप्त करण्यात आली. जप्त केलेली एमडी कुख्यात मकसुदजवळून खरेदी केली होती. मकसुद एका प्रकरणात पोलिसांना हवा आहे. तो उत्तर प्रदेशातून एमडीची तस्करी संचालित करतो. ही कारवाई पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, सहायक पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरले, सूरज सुरोसे, हवालदार प्रदीप पवार, राजेश देशमुख, समाधान गीते, नामदेव टेकाम, शिपाई विनोद गायकवाड, नितीन मिश्रा, कपिलकुमार तांडेकर, अश्विन मांगे, सगीर शेख, नितीन साळुंखे, राहुल पाटील आणि रुबिना शेख यांनी केली.

..............